suvarna kale esakal
सोलापूर

Success Story : सुवर्णा काळे यांचा गृहिणी ते सामाजिक कार्यकर्ता हा विलक्षण प्रवास

सुवर्णा काळे यांचे कार्य, सुखी जीवन सोडून सेवेचा ध्यास; गरजू रुग्णांना आवश्‍यक मदत मिळवून देण्यासाठी अखंड धडपड

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर ः भरपूर शिक्षण...कुटुंब उत्तम आर्थिक सुस्थितीत...वाचन लेखनातून विकसित झालेली संवेदना...कुटुंबाच्या जबाबदारीचे ओझे हलके होताच स्वतःच्या सामाजिक कार्याचा शोध घेणाऱ्या सुवर्णा काळे यांचा गृहिणी ते सामाजिक कार्यकर्ता हा विलक्षण प्रवास वेगळ्या वाटेची चुणुक दाखवणारा आहे.

सुवर्णा काळे यांचे माहेर सोलापूरचे. सेवासदन प्रशालेत स्वावलंबनाचा संस्कार झाला. बीए व डीएडचे शिक्षण त्यांनी घेतले. नंतर फूड प्रिझर्व्हेटीव्हचा विशेष कोर्स पूर्ण केला. हस्तकलेचे शिक्षण देखील त्यांनी घेतले.

विवाहानंतर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढल्या. पण त्यातही त्यांनी काही हस्तकलेचे वर्ग घेतले. मुलांच्या शिकवणी सुरू केल्या. प्रत्यक्षात सुस्थितीत कुटुंब असल्याने त्याची गरज देखील नव्हती.तरीही त्यांचा शिक्षकी पेशा नवी क्षितिजे खुणावत होता.

टीव्ही मालिका किंवा मनोरंजनात त्यांनी कधी लक्ष दिले नाही. उलट त्याही काळात त्यांनी वाचन व लेखनातून ज्ञानजिज्ञासा कायम ठेवली. कुटुंबातील मुलांची जबाबदारी वाढत गेली. जबाबदारीच्या ओझ्यात सामाजिक संवेदना कायम असायची.

अखेर त्यांचा मोठा मुलगा प्रथमेशने आईने काही आवडते कार्य करावे असा त्यांच्याकडे आग्रह धरला. सर्वच कुटुंबीयांनी देखील त्यांना या कामासाठी पाठबळ देण्याचे ठरवले.

त्यावेळी नेमकी लायन्स क्लब ऑफ सोलापूरच्या नेत्रालयात जनसंपर्क अधिकाऱ्याची जागा निघाली. ही समाजाचे ऋण फेडण्याची संधी समजून त्यांनी हे काम स्वीकारले. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये फिरून वृद्धांना मोतीबिंदू तपासणीसाठी नेत्रालयात पाठवून त्यांना या सेवेचा मोफत लाभ मिळवून द्यायचा असे हे काम होते.

संपूर्ण शहरात त्या सहा व्हीजन सेंटरला भेट देऊन रुग्णांना नेत्रालयात पोचवण्याचे काम करतात. ज्यांना गोळ्या व औषधी देखील घेता येत नाहीत त्यांना ते मिळवून देतात.

अनेक घरात एकाकी वृध्द सापडले तर त्यांना तत्काळ लोकमंगलच्या अन्नपूर्णा योजनेत जोडून देत त्यांना जेवणाची सोय करून देण्याचे काम देखील त्या स्वयंप्रेरणेने करतात. गुडघ्याचा त्रास होत असल्याने घरची मंडळी काम थांबवण्याचा सल्ला देत असले तरी त्या त्यावर मात करून त्या कार्यात मग्न आहेत.

  • गरजूंना अन्नपूर्णा योजनेची मदत

  • बीए, डीएड पर्यंत शिक्षण

  • फूड प्रिझर्वेशन व हस्तकलेचे शिक्षण

  • कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करून सामाजिक कार्यात काम

  • शहरभर फिरून गरजू रुग्णांचा अखंड शोध

  • शेकडो रुग्णांना मदत मिळवून देण्याची धडपड

  • कुटुंबाकडून सामाजिक कार्यासाठी पाठबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT