Sugar cane
Sugar cane 
सोलापूर

उपरी येथील तरुणाचा आविष्कार ! तयार केले ऊस भरणी यंत्र

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : तोडणी केलेला ऊस ट्रॅक्‍टर - ट्रेलर किंवा ट्रकमध्ये भरणे आता सोपे झाले आहे. उपरी (ता. पंढरपूर) येथील बारावीचे शिक्षण झालेल्या रेवण समाधान नागणे या तरुणाने आता ऊस भरणी यंत्र तयार केले आहे. ऊस भरणी यंत्रामुळे ऊस तोडणी मजुरांचा त्रास तर कमी होणार आहेच, शिवाय चार तासांचे काम अवघ्या दोन तासांमध्ये होणार आहे. स्वतःच्या कल्पक बुद्धिमतेच्या जोरावर तयार केलेले हे यंत्र यशस्वी झाले आहे. पळशी येथील एका ऊस तोडणी आणि वाहतूक ठेकेदाराने हे यंत्र खरेदीही देखील केले आहे. 

साखर कारखान्यांमध्ये ऊस तोडणी आणि वाहतूक या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. ऊस तोडून वाहनात भरून देण्याचे काम सर्रासपणे आजही मजुरांकडून केले जाते. दिवसभर ऊस तोडून रात्री डोक्‍यावर, खांद्यावर अवजड उसाची मोळी घेऊन शिडी किंवा फळीवर चढून ट्रॉली किंवा ट्रक भरून तो कारखान्यावर पाठवला जातो. असे हे अंग मेहनतीचे आणि तितकेच जोखमीचे काम मजुरांना करावे लागते. आतापर्यंत साखर उद्योगात अनेक नवीन बदल आले. ऊस तोडणीसाठी चक्क यंत्रेही आली; परंतु मजुरांनी तोडलेला ऊस भरणीसाठी यंत्र अद्याप आले नव्हते. त्यामुळे सर्रासपणे आजही लहान मुले, महिला आणि पुरुष मंडळी उसाच्या मोळ्या वाहून ट्रॅलीमध्यमे भरण्याचे काम करतात. हे काम करताना अनेकदा अपघात आणि दुखापत देखील होते. सलग चार ते पाच तास उसाच्या मोळ्यांची वाहतूक करून वाहन भरले जाते. 

ऊस तोडणी मजुरांचे कष्ट आणि त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी येथील बारावीपर्यंत शिकलेल्या रेवण नागणे या तरुणाने ऊस भरणी यंत्र तयार केले आहे. लोखंडी अँगल, रबरी पट्टा आणि इंजिनचा वापर करून त्याने अवघ्या दहा दिवसांमध्ये हे यंत्र तयार केले आहे. यासाठी 70 हजार रुपयांचा खर्च आला आहे. या ऊस भरणी यंत्रामुळे महिला व पुरुष मजुरांचा त्रास कमी होणार आहे. शिवाय ट्रॅक्‍टर - ट्रेलर भरणीसाठी लागणारा अवधी देखील कमी होणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऊस तोडणी मजुरांचा तुडवडा भासणार आहे. या पार्श्वभूमीवर हे ऊस तोडणी यंत्र उपयोगी येणार आहे. या यंत्रामुळे कमी मजुरात ऊस भरता येणार आहे. त्याचा फायदा साखर कारखान्यांना व ऊस तोडणी ठेकेदारांनाही होणार आहे. हे यंत्र पाहण्यासाठी अनेकांची गर्दी वाढली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

राजापेक्षा प्रधान श्रीमंत! किंग चार्ल्स यांच्यापेक्षा ऋषी सुनक,पत्नी मूर्तींची संपत्ती जास्त

MS Dhoni RCB vs CSK : पराभवानंतर नाराज झालेल्या धोनीनं RCB खेळाडूंशी हस्तांदोलनही नाही केलं?

Amruta Khanvilkar: "आई किंवा बहिणीबरोबर फिरते पण नवऱ्यासोबत का फिरत नाहीस?", चाहतीचा प्रश्न; अमृतानं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

SCROLL FOR NEXT