hand sanittizer 
सोलापूर

साखर कारखानदारांचे यश : सोलापूरचे सॅनिटायजर जाणार इतर राज्यात

प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ना कोणते औषध आहे, ना कोणती लस. वारंवार हात धुणे, गर्दीत जाण्याचे टाळणे आणि मास्क वापरणे हे प्रतिबंधात्मक उपायच सध्या महत्त्वाचे मानले जातात. हात धुण्यासाठी सॅनिटायजरची मागणी वाढली आणि संपूर्ण देशात सॅनिटायजरचा तुटवडा झाला. साखर कारखानदारीत देशात नंबर वन असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी (डिस्टिलरी असलेल्या) सॅनिटायजर निर्मिती सुरू केली आहे. सोलापुरातील सॅनिटायजर आता परराज्यात पाठविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने हालचाली सुरू झाल्या आहेत. 
हेही वाचा - मोठी बातमी! ठाकरे सरकार काढणार साठ हजार कोटींचे कर्ज 
सोलापूर जिल्ह्यातील ब्रिमासागर डिस्टिलरी श्रीपूर, पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर, विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगाव, जकराया शुगर वटवटे, विष्णू-लक्ष्मी डिस्टिलरी अक्कलकोट रोड सोलापूर, लोकमंगल शुगर बीबीदारफळ, फॅबटेक शुगर नंदूर या ठिकाणी सॅनिटायजर निर्मितीला सुरवात झाली आहे. सोलापूर व महाराष्ट्रातील सॅनिटायजरची गरज भागवून सोलापुरातील सॅनिटायजर आता इतर राज्यांत पाठविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. एका दिवसाला 30 हजार लिटर ते एक लाख लिटर सॅनिटायजर बनविण्याची क्षमता या सात डिस्टिलरींमध्ये आहे. 
हेही वाचा - सोलापुरात "सोशल डिस्टन्स'चे तीन तेरा 
या सात डिस्टिलरींशिवाय युटोपियन शुगर, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आणि टेंभुर्णी येथील खंडोबा डिस्टिलरीची सॅनिटायजर निमिर्तीची परवानगी अंतिम टप्प्यात आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये त्यांनाही परवानगी मिळेल, अशी माहिती औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त भूषण पाटील यांनी दिली. ज्या साखर कारखान्यांकडे डिस्टिलरी प्रकल्प व बॉटलिंग प्रकल्प आहे, त्यांनाही मान्यता देण्यात आली आहे. ज्यांच्याकडे बॉटलिंग प्रकल्प नव्हता, त्यांना हा प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
सिद्धेश्‍वर, सासवड शुगरची चाचपणी 
सोलापुरात असलेल्या सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने व माळशिरस तालुक्‍यातील दि सासवड माळी शुगर या कारखान्यांनीही सॅनिटायजर निर्मितीबाबत औषध प्रशासनाकडे चाचपणी केली होती. नंतर मात्र या कारखान्यांनी आवश्‍यक त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने या कारखान्यांमधील सॅनिटायजर निर्मितीचे प्रयत्न सध्या थांबलेले दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Matcha Drink : इन्स्टाग्रामपासून घराघरांत पोहोचले माचा! ‘हिरव्या माचा’ची देशभरात क्रेझ; गुगल सर्चमध्ये १३०० टक्क्यांची वाढ

SCROLL FOR NEXT