pur.jpg 
सोलापूर

अतिवृष्टीत पिकांचे व घराचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना

हुकूम मुलानी

मंगळवेढा(सोलापूर)ः मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांचे व घराचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्याची माहिती आ. भारत भालके यांनी दिली. 

तळसंगी येथील तीन शाळकरी बालके खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाली. त्या नातेवाईकांचे सांत्वन करून जात असताना आ.भालके यांनी ही माहिती दिली. त्याच्या समवेत राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे लतीफ तांबोळी,स्वीय सहायक रावसाहेब फटे होते. 

आ. भारत भालके म्हणाले की, सध्या उजनी धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे उजनीत जादा झालेले पाणी नदी कालव्याद्वारे सोडण्यात येत आहे. परंतु कालव्याच्या लाभक्षेत्रात अगोदर पाऊस झाला आहे पावसाचे व कालव्याची पाणी यामुळे जमीन क्षारपड होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यासाठी कालव्याद्वरारे सोडलेले पाणी बंद करून नदीद्वारे सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंगळवेढा ते बोराळे, मंगळवेढा ते खोमनाळ, मंगळवेढा ते पाटकळ, मारापुर ते गुंजेगाव, मारापुर ते घरनिकी या गावात दरम्यान असणाऱ्या रस्त्यावरील पुलाची उंची कमी राहिल्यामुळे पावसाचे पाणी पुलाच्यावर गेल्याने ही वाहतूक बंद झाली. पुलाची उंची वाढवण्या संदर्भात सूचना दिल्या असून मंजूर कामे का प्रलंबित आहेत याची देखील विचारणा संबधिताकडे करण्यात आली. 
यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षीपेक्षा समाधान पावसामुळे पिके जोमात आली. अचानक झालेल्या पावसामुळे पेरू, डाळिंब, द्राक्षे, मका, बाजरी, सुर्यफूल, कांदा, भुईमूग, तूर, भाजीपाला पिकांचे मोठ्या नुकसान झाले. काही शेतकऱ्यांची पिके अजुनही पाण्यात आहेत. कोरोनामुळे शेतकरी अडचणीत असताना पावसामुळे शेतकरी अधिकच अडचणीत आला. हवामान खात्याने आणखीन पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचे आ.भालके म्हणाले.  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: CSK विरुद्ध काय प्लॅन केला होता? सूर्यवंशीचा खुलासा; वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल म्हणाला, 'केक लावतील म्हणून...'

'माझ्या भावाने मला 'घंटागाडी'....' ठरलं तर मग मालिकेतील जुई गडकरीला घरी काय नावाने हाक मारतात? अभिनेत्री म्हणाली...

Latest Marathi News Live Update : विदर्भात अवकाळी पावसाचा कहर; रब्बी पिकांचे मोठे नुकसान

IPL 2026: फॉर्म, फटका आणि फोकसची परीक्षा! शुभमन गिल-श्रेयस अय्यर आज आमणे सामने; कशी असेल संभावित Playing XI

Nagpur News: कामगाराचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; कामगाराची पार्श्वभूमी व रहिवास

SCROLL FOR NEXT