The Thackeray government will use the funds of Fadnavis's time 
सोलापूर

फडणवीसांच्या काळातील निधी ठाकरे सरकार वापरणार

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. योजना जाहीर केली, परंतु योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर निधी उपलब्ध नव्हता. जुन्या कर्जमाफीच्या योजनेतील निधी नव्या कर्जमुक्तीच्या योजनेसाठी खर्च करण्यास सहकार विभागाने मान्यता दिली आहे.

दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, मेळावे घेणे, योजनेला व्यापक प्रसिद्धी देणे, कंत्राटी मनुष्यबळ, आपलं सरकार केंद्राला निधी देणे यासाठी निधी आणायचा कोठून? हा प्रश्‍न पडला होता. जिल्हास्तरावर कर्जमुक्ती योजनेला निधी देण्यासाठी जुन्या कर्जमाफीच्या योजनेतील शिल्लक 4.5 कोटी रुपये निधी शिल्लक होता. त्यातील एक कोटी 70 लाख रुपये नव्या कर्जमाफीच्या योजनेसाठी खर्च केले जाणार आहेत.

मुंबई वगळून राज्यातील सर्व जिल्ह्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. जिल्हास्तरावर हा निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून येत्या काळात प्रसिद्धी, मेळावे, प्रशिक्षण हा खर्च या निधीतून भागविला जाणार आहे. सहकार, महसूल, कृषी विभाग सध्या कर्जमुक्ती योजनेत मिशन मोडवर कामाला लागले आहे. शेतकऱ्यांची माहिती तपासून पूर्ण झाली आहे. फेब्रुवारीपासून पोर्टलवर ही माहिती अपलोड केली जाणार आहे. मार्चमध्ये या योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळेल अशी शक्‍यता आहे. 

दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याबद्दल उत्सुकता 
दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना सरकार कशापद्धतीने दिलासा देईल. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्या शेतकऱ्यांना सरकार प्रोत्साहन म्हणून किती रक्कम देणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कर्जमुक्ती योजनेतील दुसरा व तिसरा टप्पा अद्यापही जाहीर झालेला नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT