वैरागच्या 'या' मोर्चामुळे संमत झाला 'रोहयो' कायदा! गोळीबाराच्या खुणा आजही जिवंत
वैरागच्या 'या' मोर्चामुळे संमत झाला 'रोहयो' कायदा! गोळीबाराच्या खुणा आजही जिवंत Canva
सोलापूर

वैरागच्या 'या' मोर्चामुळे संमत झाला 'रोहयो' कायदा !

संतोष कानगुडे

या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला. यात असंख्य लोक जखमी झाले तर आठ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले.

वैराग (सोलापूर) : दुष्काळात कामगारांच्या हाताला काम द्या, कामाचा दाम व धान्य द्या, या मागण्यांसाठी 6 सप्टेंबर 1971 रोजी वैराग (ता. बार्शी) (Barshi) येथे शासकीय गोदामावर (Government warehouse) हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर पोलिसांनी (Police) गोळीबार केला. यात असंख्य लोक जखमी झाले तर आठ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. वैरागच्या हौतात्म्याने संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) रोजगार हमी कायदा (Employment Guarantee Act) दिला. या घटनेला 6 सष्टेंबर 2021 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. आजही या घटनेचा इतिहास (History) वैराग व भागातील जनता विसरू शकत नाही.

1971 साली बार्शी तालुक्‍यातील जनता दुष्काळात होरपळत होती. या पार्श्वभूमीवर वैराग व भागात दुष्काळाच्या भीषण झळा सोसणाऱ्या ग्रामस्थांनी दुष्काळी योजनात हलगर्जीपणा करणाऱ्यांच्या विरोधात विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते उद्धवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "हाताला काम द्या, कामाचा दाम व धान्य द्या' आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात माजी आमदार स्व. चंद्रकांत निंबाळकर, भाई विश्वासराव फाटे, भाई सर्जेराव सगर, भाई ज्ञानेश्वर पाटील, भाई सुभाष डुरे-पाटील, भाई गणपतराव जोशी, भाई जिवाजीराव पाटील, भाई रोहिदास कांबळे आदी नेते सहभागी झाले होते. या वेळी प्रशासनाने जनतेच्या मागण्यांचा विचार करण्याऐवजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. होले, तत्कालीन उपजिल्हाधिकारी जोडवेकर व तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी डेमला यांनी मोर्चेकऱ्यांवर लाठीमार करण्याचे आदेश दिले. या वेळी पोलिसांनी आंदोलकांवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये हजारो लोक जखमी झाले, तर शेकडो लोक जायबंदी झाले. या वेळी आठ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले.

गोळीबाराचा खटला चालवण्यासाठी बार्शी येथे विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. यात मोर्चेकऱ्यांच्या बाजूने वकील म्हणून बी. एन. देशमुख यांनी काम पाहिले होते. अनेक वर्षे हा न्यायालयीन लढा सुरू असताना शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शासनातर्फे हा खटला मागे घेतला. या सर्व इतिहासाच्या स्मृती आजही वैराग भागात जिवंत आहेत.

आठ हुतात्मे...

एकनाथ ज्योती साळुंके (वैराग), इब्राहिम चांदसाहेब शेख (वैराग), सुंदराबाई लक्ष्मण चव्हाण (वैराग), बब्रुवाहन तुळशीराम माळी (मानेगाव), भास्कर बाबूराव वाळके (मानेगाव), रघुनाथ श्रीपती माने (रातंजन), उद्धव श्रीपती गोफणे (हळदुगे), चतुर्भुज विठ्ठल ताकभाते (श्रीपत पिंपरी) या आठ जणांना या वेळी हौतात्म्य पत्करावे लागले होते.

रोजगार हमी कायदा सहमत झाला

भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 6 सप्टेंबर 1971 रोजी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील अनेक गावांत मोर्चे काढण्यात आले. या मोर्चावर इस्लामपूर, नागपूर, वैराग या ठिकाणी गोळीबार करण्यात आला. या मोर्चामुळेच महाराष्ट्रात रोजगार हमीचा कायदा सहमत करण्यात आला हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Meta AI : व्हॉट्सअ‍ॅपवर कसं वापरायचं 'मेटा एआय'? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Share Market Holiday: आज महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT