prashant paricharak, mahesh kothe,  rajan patil, dilip mane
prashant paricharak, mahesh kothe, rajan patil, dilip mane  esakal
सोलापूर

आता विधान परिषदेसाठी इच्छुकांना आमदारकीचा मौका

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदार संघाची निवडणूक पुढे गेल्याने उमेदवारांचा काही प्रमाणात तर मतदारांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला आहे. सोलापूरची ही निवडणूक साधारणता मे-जून 2022 मध्ये होण्याची शक्‍यता आहे. 7 जुलै 2022 रोजी विधानपरिषदेच्या दहा सदस्यांची मुदत संपत आहे.

विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदार संघातील तगडे स्पर्धक म्हणून अनेक महिन्यांपासून आमदार प्रशांत परिचारक आणि माजी आमदार दिलीप माने या दोनच नावांची अधिक चर्चा राहिली आहे. सोलापूरची निवडणूक पुढे गेली की पुढे ढकलली? हा संशोधनाचा विषय आहे. ही निवडणूक लांबणीवर पडल्याने तूर्तास तरी राष्ट्रवादीला व महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीनंतर पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला धोबीपछाड देण्याची पूर्ण तयारी भाजपने केली होती. जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती सभापती निवडी, नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकानंतरच सोलापूरच्या विधान परिषदेची निवडणूक होणार हे आता जवळपास निश्‍चित झाले आहे.

आमदार प्रशांत परिचारक व माजी आमदार दिलीप माने यांच्यात या जागेसाठी सामना होऊ शकतो. विधानसभा सदस्यांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषद सदस्यांच्या निवडणुकीत मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी महापौर महेश कोठे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील या पैकी कोणाला राष्ट्रवादीच्या कोठ्यातून संधी मिळणार का? या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मोहोळ मतदार संघ राखीव झाल्यानंतरही सलग तीन वेळा राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणण्यात माजी आमदार राजन पाटील यांचा मोठा वाटा आहे. विधानपरिषदेवर घेण्याबाबतचा त्यांचा क्‍लेमही जुना आहे.

दरम्यानच्या काळात सोलापूर महापालिकेची निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. सोलापूरचा महापौर राष्ट्रवादीचा झाल्यास या कामगिरीची बक्षिसी म्हणून व 2024 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून माजी महापौर कोठे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. भाजपने ज्या पध्दतीने आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांना महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात लढण्यासाठी मैदानात उतरविले आहे. त्याच धर्तीवर भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या नावाचा विधान परिषदेसाठी विचार होऊ शकतो. वक्तृत्व शैली, संघटन कौशल्य आणि राज्यभर असलेला संपर्क यामुळे उमेश पाटील यांचा उपयोग राष्ट्रवादीला राज्यभर यानिमित्ताने होणार आहे. उमेश पाटील यांचे उपयोग मुल्य अधिक असल्याने त्यांच्या नावाचा देखील विचार होऊ शकतो.

या दहा जागा होणार रिक्त

भाजपचे आमदार रामनिवास सिंह, प्रसाद लाड, विनायक मेटे, प्रवीण दरेकर, सुजितसिंह ठाकूर व सदाभाऊ खोत, शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते व सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर व संजय दौंड या दहा जणांच्या सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2022 रोजी पूर्ण होत आहे.

राष्ट्रवादी, शिवसेनेचे जिल्ह्याकडे दुर्लक्षच

सोलापूर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदार संघातील आमदारकीशिवाय सोलापूर जिल्ह्याला कॉंग्रेसच्या माध्यमातून विधानपरिषदेवर संधी मिळाली. तशी भरभरुन संधी भाजपनेही सोलापूर जिल्ह्याला दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र विजयसिंह मोहिते-पाटील यांना दिलेल्या दीड वर्षाच्या आमदारकी शिवाय जिल्ह्यातील एकाही नेत्याला विधान परिषदेवर संधी दिली नाही. शिवसेनेच्या माध्यमातूनही सोलापूर जिल्ह्याला एकदाची विधान परिषदेची संधी मिळाली नाही. कॉंग्रेस आणि भाजपने जिल्ह्यातील नेतृत्वाला विधान परिषदेत संधी दिली. तशी संधी देताना राष्ट्रवादी आणि शिवसेना मात्र का आखडता हात घेत असल्याचे दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT