Child-Labour SAKAL
सोलापूर

बालमजुरी करणारा ‘तो’ म्हणाला..! आई आजारी आहे, बहिण लग्नाला आलीय काम करावे लागते

कोरोनामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला, घरात आई आजारी आहे, बहिण लग्नाला आली आहे, तिला चांगला पती मिळावा, विवाहातील सर्व वस्तू देता याव्यात, पालकांना हातभार लागेल म्हणून मला काम करावे लागत असल्याची ह्दयद्रावक कहाणी एका चायनिज गाड्यावर काम करणाऱ्या १४ वर्षीय मुलाने सांगितली.

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला, घरात आई आजारी आहे, बहिण लग्नाला आली आहे, तिला चांगला पती मिळावा, विवाहातील सर्व वस्तू देता याव्यात, पालकांना हातभार लागेल म्हणून मला काम करावे लागत असल्याची ह्दयद्रावक कहाणी एका चायनिज गाड्यावर काम करणाऱ्या १४ वर्षीय मुलाने सांगितली.

सोलापूर शहरात कामगार वर्ग मोठा असून अनेकांचे हातावरील पोट आहे. काम केले तरच पोटभर अन्न मिळते, मुलांचे शिक्षण, कपडे व इतर खर्च भागतो, अशी आवस्था त्यांची आहे. १२ ते १६ वयोगटातील मुले शिक्षणाला बगल देऊन चायनिज गाडे, कापड दुकाने, हॉटेल, बांधकामांवर काम करतात. सात रस्ता परिसरातील एका चायनिज गाड्यावर दिसायला छान, उंच, पण वयाने लहान मुलगा काम करीत होता. ग्राहकांनी ऑर्डर दिल्यानंतर त्यांना तो आणून देत होता. रिकाम्या प्लेटा स्वच्छ करण्याचेही काम तो करायचा. सायंकाळी सहा ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत काम केल्यानंतर त्याला १५० ते २०० रुपयांची मजुरी मिळायची. काहीवेळाने त्याच्याजवळ जाऊन त्याला शाळेत जातो का, असा प्रश्न केला. त्यावेळी त्याने जे सांगितले, त्यामुळे डोळे पाणावले. तो म्हणाला, ‘घरात आई आजारी आहे, वडिल दारू पितात आणि मोठी बहिण लग्नाला आलीय. दुसरा लहान भाऊ मोठा ऑफिसर व्हायचे म्हणतोय, महापालिकेच्या शाळेत जाणारा तो भाऊ हुशार आहे. त्यामुळे मी आठवीपर्यंत शिक्षण घेतले आणि आता शाळा बंद असल्याने अशी कामे करतोय. मिळालेल्या पगारातून आईची औषधे आणतो, काही पैसे मोठ्या बहिणीकडे देतो. बहिण पण दुसरीकडे कामाला जाते आणि त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. वडिलही कधी कधी कामाला जातात’. त्या मुलाला शिक्षण घेतल्यावर तुलापण नोकरी मिळेल, सगळी परिस्थिती बदलण्याची ताकद शिक्षणात आहे, आयटीआय कर किंवा व्यवासायिक शिक्षण घे, टायपिंग शिकून घे म्हणजे लवकर जॉब लागेल, असे त्याला सांगितले. आता तीन दिवसांपासून तो मुलगा त्याठिकाणी दिसला नाही.

परिस्थितीने नडलेलेच बहुतेक बालमजूर

कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असल्याने, घरातील कोणीतरी आजारी असल्यानेच अनेक अल्पवयीन मुले मजुरी करत असल्याचे आढळत आहे. १ ते ११ जून या कालावधीत ‘ऑपरेशन मुस्कान’मध्ये जवळपास अडीचशे मुले मजुरी करताना आढळली. त्यांना व पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन मजुरीपासून रोखले जात आहे.

- विजया कुर्री, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: दिवाळी पार्टीच्या नावाखाली Koregaon Park मधील नामांकित बारमध्ये रंगला पोकरचा डाव? | Sakal News

Rishabh Pant कडे भारतीय संघाचे नेतृत्व! १८ वर्षीय आयुष म्हात्रेची निवड; जाणून घ्या कधी व केव्हा होणार हायव्होल्टेज मालिका

Latest Marathi News Live Update : पुण्यात फटाक्यामुळे तीन ठिकाणी आगीच्या घटना

'...तर तात्या विंचू तुम्हाला चावेल, रात्री येऊन तुमचा गळा दाबेल'; मोदी भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंना असं का म्हणाले संजय राऊत?

Diwali Bonus Dispute : बोनस कमी मिळाल्याने संतप्त टोल कर्मचाऱ्यांनी घेतला बदला; हजारो वाहने शुल्काशिवाय सोडली, कंपनीला लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT