Vitthal Mandir Esakal
सोलापूर

विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचा सर्वंकष आराखडा सादर करा : जिल्हाधिकारी

विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचा सर्वंकष आराखडा सादर करा : जिल्हाधिकारी

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

शासकीय विश्रामगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या पंढरपूर दौऱ्याच्या अनुषंगाने प्राप्त निवेदने व निर्देशास अनुसरून बैठक घेण्यात आली.

पंढरपूर (सोलापूर) : लाखो वारकरी सांप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराचे (Sri Vitthal-Ruktramini Temple) संवर्धन व संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेला सर्वंकष आराखडा भारतीय पुरातत्त्व विभागाने (Department of Archeology of India) तत्काळ मंदिर समितीकडे सादर करावा. तुळशी वृंदावन देखभाल व दुरुस्तीसाठी मंदिर समितीकडे हस्तांतरण करण्यासाठी वन विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिद शंभरकर (Collector Milid Shambharkar) यांनी दिले. (The District Collector directed to submit a comprehensive plan for the conservation of the Vitthal Temple-ssd73)

शासकीय विश्रामगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या पंढरपूर दौऱ्याच्या अनुषंगाने प्राप्त निवेदने व निर्देशास अनुसरून बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी हे निर्देश दिले. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार सुशील बेल्हेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी एस. के. पिसे, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे, वास्तू विशारद प्रदीप देशपांडे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे तसेच महावितरण, पाटबंधारे, नगरपालिका विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. शंभरकर म्हणाले, विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराचा सर्वंकष आराखडा पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली वास्तुविशारद यांच्याकडून तयार करण्यात आला आहे. पुरातत्त्व विभागाच्या मंजुरीनंतर मंदिर समितीच्या मान्यतेने शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात येणार आहे. मंदिराचे पुरातन रूप, वैभव तसेच ठेवण्यात येणार आहे. यामध्ये महाराज मंडळी, भाविक व नागरिकांच्या काही सूचना असतील तर त्यांचा समावेश करावा. तसेच पुरातत्त्व विभागाने अंदाजपत्रक सादर करताना सर्वसमावेशक खर्चासह सादर करावे.

या वेळी भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या भक्त निवासाच्या विद्युत कनेक्‍शन दराबाबत महावितरणने (MSEDCL) तत्काळ प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करावा. भीमा पाटबंधारे विभागाने विष्णुपद बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीबाबत आवश्‍यक कार्यवाही करावी. तुळशी वृंदावन देखभाल व दुरुस्तीसाठी मंदिर समितीकडे हस्तांतरण करण्यासाठी वन विभागाने कार्यवाही करावी अशा, सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

मंदिर समितीमार्फत भाविकांच्या सोयी- सुविधेसाठी अल्पदरात देण्यात येणारा प्रसाद, "श्रीं'चे फोटो व इतर विक्रीवरील मूल्यवर्धित कर माफ करण्यात यावा. यमाई तलाव येथील उपलब्ध शासकीय जमीन गोशाळेसाठी मंदिर समितीला देण्यात यावी, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी या वेळी सांगितले.

स्कायवॉक, पत्राशेड निधी उपलब्ध व्हावा

श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या दर्शनासाठी आलेला भाविकांच्या सोयी सुविधेसाठी स्कायवॉक व पत्राशेड येथील दर्शन हॉल उभारण्यासाठी निधीची उपलब्धता व्हावी. तसेच सामाजिक संस्थेसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थाना ज्या पद्धतीने वीज आकारणी केली जाते तशीच वीज आकारणी भक्त निवास येथे विद्युत कंपनीने करावी, अशी मागणी श्री. ढोले यांनी या वेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT