आत्मविश्वासातून पिकवले सोने! वीस गुंठ्यात वीस दिवसात साठ हजारांचे उत्पादन
आत्मविश्वासातून पिकवले सोने! वीस गुंठ्यात वीस दिवसात साठ हजारांचे उत्पादन Canva
सोलापूर

आत्मविश्वासातून पिकवले सोने! वीस दिवसात साठ हजारांचे उत्पादन

श्रावण तीर्थे

जगताप कुटुंबाला फक्त 35 गुंठे शेती आहे. या शेतीतच त्यांची विहीर व त्यांना राहण्यासाठी घर व रेशीम किड्यांचे शेड आहे.

कोरवली (सोलापूर) : शेतीतही सोने (Gold) पिकवता येतं. त्यासाठी आत्मविश्वास आणि मेहनत करण्याची जिद्द असावी लागते, हे उद्‌गार आहेत सोहाळे (ता. मोहोळ) येथील रेशीम उत्पादनातून (Silk production) विक्रमी उत्पन्न घेणारे सचिन जगताप (Sachin Jagtap) व माधुरी जगताप या कष्टकरी जोडप्याचे. जगताप कुटुंबाला फक्त 35 गुंठे शेती आहे. या शेतीतच त्यांची विहीर व त्यांना राहण्यासाठी घर व रेशीम किड्यांचे शेड आहे. त्यांना कसण्यासाठी फक्त वीस गुंठे शिल्लक आहे. त्यावरच ते संसाराचा गाडा ओढत होते.

कुटुंब चालवणे कठीण झाल्याने जगताप यांनी कुक्कुटपालन, शेळीपालन व ससे पालन असे शेतीपूरक अनेक उद्योग केले; पण त्यात काही त्यांचा मेळ बसेना म्हणून ते एका खासगी कंपनीमध्ये काम करू लागले. कुटुंब चालवण्यासाठी काय करावे काय नाही, हा गंभीर प्रश्‍न सतावत होता. अशा परिस्थितीत गावातील अरुण बचुटे या शेतकऱ्याची रेशीम शेती जगताप यांनी पाहिली. त्यावरून त्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याचे ठरवले. त्यांनी रेशीम विभाग अधिकारी शिवानंद जोधने व कीटक संगोपन अधिकारी कृष्णात आदलिंगे यांची भेट घेतली. त्यांनी प्रोत्साहन दिले व पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे सचिन जगताप व माधुरी जगताप यांनी ठरवले. वीस गुंठ्यात तुतीची लागवड करून रेशीम उद्योगास सुरवात केली. त्यांनी पहिले उत्पादन अवघ्या वीस दिवसात वीस गुंठ्यात साठ हजार रुपयांचे घेतले. त्यांचे कमी कालावधीतील रेशीम उत्पादन पाहता, परिसरातील शेतकरी अवाक्‌ झाले आहेत.

कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना संजीवनी देणारा रेशीम शेती हा उत्तम जोडव्यवसाय असल्याचे या जोडप्याने सिद्ध केले आहे. या शेतकरी जोडप्याने रेशीम शेती करून शेतकऱ्यांना शेतीची नवी दिशा दाखविली आहे. रेशीम शेतीचे भरघोस उत्पादन घेतल्याबद्दल कृष्णात आदलिंगे व शिवानंद जोधने या रेशीम अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांची रेशीम शेती व नियोजन पाहण्यासाठी परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत व मार्गदर्शन घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT