Corona Vaccine Media Gallery
सोलापूर

लसीचा पहिला डोस बंद! दुसऱ्या डोससाठीच जिल्ह्याला साडेनऊ हजार लस

कोरोना लसीचा पहिला डोस बंद झाला असून दुसऱ्या डोसला प्राधान्य

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीचा (Preventive vaccine against coronavirus) तुटवडा असल्याने आता पहिल्या डोसऐवजी 84 दिवस पूर्ण झालेल्यांच्या दुसऱ्या डोसलाच प्राधान्य दिले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील नऊ हजार 600 व्यक्‍ती दुसरा डोससाठी पात्र असून त्यांच्यासाठी तेवढीच लस मिळाली आहे. शहर-जिल्ह्यातील 20 केंद्रांवर हे लसीकरण होणार आहे. (The first dose of corona vaccine is discontinued and the second dose is preferred)

सोलापूरसह राज्यात कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी होत असतानाच मृत्यूदर वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पहिला डोस देण्याऐवजी 84 दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस टोचला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील 18 वर्षांवरील 30 लाख व्यक्‍तींना लस टोचणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत पाच लाख डोस मिळाले असून एकाचवेळी सहा लाख डोस मिळावेत, अशी मागणी अनेकांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत केली आहे. तरीही, त्याची दखल कोणीच घेतलेली नाही. लसीअभावी जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे दोन दिवसांपासून बंद आहेत. तर 339 केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करूनही आतापर्यंत कधीच सर्व केंद्रे सुरू झालेली नाहीत. जिल्ह्यासाठी किमान 50 हजार डोस मिळतील, अशी अपेक्षा असतानाही केवळ नऊ हजार 600 डोस मिळाले आहेत. त्यातून तीन हजार डोस शहरासाठी तर उर्वरित डोस ग्रामीण भागासाठी वितरीत केले आहेत.

दुसऱ्या डोससाठी स्वतंत्र याद्या

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सहजपणे बरा होऊ शकतो, असे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. राज्यात आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, मृत्यूदर वाढत असल्याने लसीच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात आहे. दुसरीकडे लसही पुरेशा प्रमाणात शिल्लक नाही. ज्या व्यक्‍तीला पहिला डोस 84 दिवस पूर्ण झाले आहेत, अशांची यादी तयार करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील नऊ हजार 600 व्यक्‍ती दुसऱ्या डोससाठी पात्र असून त्यांना संपर्क करून बोलावून घेतले जात आहे, अशी माहिती लसीकरणाचे जिल्हा समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT