'भीमा' उभारणार 90 कोटींचा आसवनी प्रकल्प! Canva
सोलापूर

Solapur : 'भीमा' उभारणार 90 कोटींचा आसवनी प्रकल्प!

'भीमा' उभारणार 90 कोटींचा आसवनी प्रकल्प!

राजकुमार शहा

आगामी काळात कारखाना सुमारे 90 कोटी रुपयांचा प्रतिदिन एक लाख लिटर उत्पादन क्षमतेचा आसवनी प्रकल्प कार्यान्वित करणार आहे, अशी माहिती धनंजय महाडिक यांनी दिली.

मोहोळ (सोलापूर) : भीमा कारखान्याचे (Bhima Sugar Factory) विस्तारीकरण झाले आहे, त्यामुळे कारखान्याला चालू हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस लागणार आहे. कुठल्याही भूलथापांना बळी न पडता शेतकऱ्यांनी सर्व ऊस गाळपासाठी भीमाला द्यावा, कारण ऊस कमी पडला तर मोठा तोटा होणार आहे. मागील राहिलेली 27 कोटींची एफआरपीची रक्कम येत्या 10 ऑक्‍टोबरच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून, आगामी काळात कारखाना सुमारे 90 कोटी रुपयांचा प्रतिदिन एक लाख लिटर उत्पादन क्षमतेचा आसवनी प्रकल्प कार्यान्वित करणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली.

टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची गाळप हंगाम 2020/21 ची सर्वसाधारण सभा ऑनलाइन स्वरूपात झाली. त्यावेळी अध्यक्ष महाडिक बोलत होते. या वेळी विश्वजित महाडिक, उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, पवन महाडिक, सुनील चव्हाण, भारत पाटील, राजू बाबर, जाकिर मुलानी, संग्राम चव्हाण यांच्यासह सर्व संचालक, विविध विभागांचे अधिकारी, शेती अधिकारी उपस्थित होते. विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक शिंदे यांनी केले.

महाडिक पुढे म्हणाले, चालू वर्षी पंचवीस मेगावॉट सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित होणार असून त्या माध्यमातून सात कोटी युनिट वीज उत्पादित होणार आहे. तर त्या माध्यमातून कारखान्याला 35 कोटी रुपये अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा सभासदांना होणार आहे. भीमाच्या विरोधात तालुक्‍यात भीमा बचाव समिती स्थापन केली असून, सातत्याने त्यांनी कारखान्याच्या विरोधात तक्रारी केल्या. यावर कहर म्हणजे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक यांनीही मुख्यमंत्री व इतरांना वेळोवेळी तक्रारी करून भीमा जास्तीत जास्त कसा अडचणीत येईल यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे यांना इतर कारखान्यांच्या ऐवजी भीमाच्या शेतकऱ्यांचाच कसा पुळका आला, असा प्रश्न अध्यक्ष महाडिक यांनी उपस्थित केला. भीमा बचाव समितीनेही तोच कित्ता गिरवला, त्यामुळे भीमा बचाव की भीमा डुबाव समिती, असा खरपूस समाचार अध्यक्ष महाडिक यांनी घेतला. केवळ यांच्या तक्रारीमुळेच एफआरपी देण्यास उशीर झाला. पालकमंत्री हे पालक असतात, राजकारण बाजूला ठेवून त्यांनी सर्वांना मदत करण्याचे धोरण अवलंबिले पाहिजे, घाणेरडे राजकारण करू नये.

दरम्यान, विषय पत्रिकेवरील विषय नंबर 12 हा अत्यंत कळीचा मुद्दा होता. कारखाना विरोधी काम करणाऱ्या व कारखाना सुरळीतपणे चालविण्यात अडचणी आणणाऱ्या सभासदांचे सभासदत्व कमी करणे, हा तो विषय होता. मात्र सभासदांनी हात वर करून तो मंजूर केला. याच विषयाच्या विरोधात भीमा बचाव समिती न्यायालयात गेली होती; मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून सदरची तक्रार फेटाळण्यात आल्याचे महाडिक यांनी सांगितले. दरम्यान, आम्ही सुमारे दोन हजार सभासदांना सभासदत्व रद्द करण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत, त्या आम्ही द्वेषातून दिल्या नाहीत. ज्यांनी गेल्या सात ते आठ वर्षांपासून भीमाला ऊस गाळपास दिला नाही असे ते सभासद आहेत. मात्र साखर नेण्यासाठी सर्वात पुढे तेच असतात, असे सांगून त्यांनी उसाची नोंद असलेला सातबारा उतारा किंवा इतर कारखान्यास पाठवलेल्या उसाच्या पावत्या द्याव्यात, असे महाडीक यांनी सांगितले.

सुधाकरपंतांचा पुतळा उभारणार

भीमा कारखान्याचे माजी अध्यक्ष स्व. सुधाकर परिचारक यांनी भीमा कारखान्यासाठी मोठे योगदान दिले आहे. कारखाना प्रगतिपथावर आणण्यात त्यांनी मोठे प्रयत्न केले. परिचारक कुटुंबीयांनी परवानगी दिली तर कारखाना कार्यस्थळावर त्यांचा अर्धपुतळा उभारण्याचा मानस आहे; जेणेकरून त्यांचा आदर्श घेता येईल, हा त्या पाठीमागचा हेतू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Suzuki: मारुती सुझुकी इंडियाचे गुजरातमधील 'या' कंपनीसोबत विलीनीकरण होणार, एनसीएलटीकडून मोठी मान्यता

Mumbai News: मुंबईकरांना दिलासा वाहतूक कोंडीतून मिळणार! MMRDA ७० किमीचा भूमिगत बोगदा बांधणार, वाचा संपूर्ण प्लॅन

Ranji Trophy, Video: ६,६,६,६,६,६,६,६.... सलग ८ षटकार अन् वेगवान अर्धशतक; २५ वर्षीय भारतीय फलंदाजाने घडवला इतिहास

Matoshree Drone: मातोश्रीवरून ड्रोन उडवल्याचे प्रकरण; आदित्य ठाकरेंचे खळबळजनक दावे, ५ प्रश्न करत संशय व्यक्त केला, म्हणाले...

Shirur Crime : टाकळी हाजी येथे शेताच्या वादातून हल्ला; दोघे जखमी, लोखंडी गज व विटेचा वापर!

SCROLL FOR NEXT