Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation 
सोलापूर

गुंठेवरीला दोन महिन्यांची मुदतवाढ! महापालिका प्रशासनाने घेतला निर्णय

तात्या लांडगे

आयुक्‍तांनी गुंठेवारीवरील बांधकामांना नियमित परवाना देण्याचा निर्णय घेतला.

सोलापूर : शहरातील हद्दवाढ भागात गुंठेवारीच्या मोठ्या प्रमाणावर जागा असून त्याला परवानगी न दिल्याने महापालिकेच्या उत्पन्नात मोठा फरक पडत असल्याच्या तक्रारी अनेक नगरसेवकांनी केल्या. या पार्श्‍वभूमीवर अतिरिक्‍त आयुक्‍त विजय खोराटे यांनी गुंठेवारीला रितसर परवानगी घेण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. (The municipal administration of Solapur city has given a two-month extension to Gunthewari)

गुंठेवारीवर जागा विकत घेऊन त्या जागेवरील बांधकाम परवाने शासन निर्णयानुसार महापालिकेने देणे बंद केले होते. त्यामुळे हजारो मिळकतींवरील बांधकामे ठप्प झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर संबंधित बांधकामांना परवाना द्यावा, अशी मागणी सभागृह नेते शिवानंद पाटील यांनीही पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली होती. त्या निर्णयाने महापालिकेला काय फायदा होईल, नागरिकांच्या अडचणी काय आहेत, याची माहिती पटवून दिली.

त्यानंतर आयुक्‍तांनी गुंठेवारीवरील बांधकामांना नियमित परवाना देण्याचा निर्णय घेतला. उशिरा का होईना आयुक्‍तांनी घेतलेल्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. या निर्णयातून महापालिकेला करातून मोठी रक्‍कम मिळणार आहे. आगामी बजेटमध्ये त्याचा विकासकामांसाठी लाभ होईल, असा विश्‍वास सत्ताधाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे. दरम्यान, शहरातील करदात्यांकडील प्रलंबित बिलांची पावती घरोघरी पाठवावी. गाळे धारकांकडून नवीन निर्णयानुसार टॅक्‍स घ्यावा, करवसुली करताना त्यांना सवलत द्यावी. प्रशासनाने कोणतीही करवाढ करू नये, अशीही मागणी शिवानंद पाटील यांनी यावेळी केली.

2001 च्या शासनाच्या निर्णयानुसार गुंठेवारीला परवानगी देण्याची प्रक्रिया काही महिन्यांपासून बंद होती. आता त्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. संबंधितांना महापालिकेकडे अर्ज करून त्याची रितसर परवानगी घेता येईल.

- विजय खोराटे, अतिरिक्‍त आयुक्‍त, सोलापूर महापालिका

(The municipal administration of Solapur city has given a two-month extension to Gunthewari)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT