Corona esakal
सोलापूर

ग्रामीणमधील मृत्यू रोखण्यात प्रशासन अपयशी

तात्या लांडगे

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर 'माझे गाव-कोरोनामुक्‍त गाव' अभियानासाठी प्रयत्न करणारे प्रशासन मृत्यू रोखण्यात अपयशी ठरत आहे.

सोलापूर : शहरातील कोरोना (Corona) कमी होत असतानाच ग्रामीणमधील रूग्णसंख्या आणि वाढलेल्या मृत्यूदराने प्रशासनाची चिंता वाढविली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर 'माझे गाव-कोरोनामुक्‍त गाव' अभियानासाठी प्रयत्न करणारे प्रशासन मृत्यू रोखण्यात अपयशी ठरत आहे. मागील दीड महिन्यांपासून दररोज सरासरी 23 ते 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. बुधवारी जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यात 23 जणांचा मृत्यू (Died) झाला असून नवे 485 रूग्ण आढळले आहेत. तर शहरात 14 रूग्ण वाढले असून एकाचा मृत्यू झाला आहे. (the number of corona patients in rural solapur is increasing)

ग्रामीण भागातील अक्‍कलकोट, बार्शी, मंगळवेढ्यातील प्रत्येकी दोन, करमाळा, माळशिरस, पंढरपूर तालुक्‍यातील प्रत्येकी तिघांचा तर माढा, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील प्रत्येकी चौघांचा बुधवारी कोरोनाने बळी घेतला आहे. मृत्यूदरात चार-पाच तालुके अव्वल असतानाही जिल्हा प्रशासनाकडून नुसती बघ्याचीच भूमिका घेतली जात असल्याची चर्चा आहे. अनेकजण गावातच उपचार घेत असून आजार अंगावर काढत आहेत. मृत्यूच्या कारणांचा शोध घेऊनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात एक लाख 27 हजार 635 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील दोन हजार 798 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या तीन हजार 199 रूग्णांवर उपचार सुरू असून शहरातील 216 रूग्ण उपचार घेत आहेत. शहरातील रूग्णसंख्या आता 28 हजार 362 झाली असून त्यातील 26 हजार 762 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

'म्युकरमायकोसिस'ची रुग्णसंख्या 419

शहर-जिल्हा प्रशासन कोरोनामुक्‍तीच्या चिंतेत असतानाच आता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांने प्रशासनावरील ताण वाढला आहे. बुधवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 419 रुग्णांपैकी 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 205 रुग्ण बरे झाले असून 180 रुग्णांवर 32 रुग्णालयातून उपचार सुरू आहेत.

शहरातील 20 प्रभागात रुग्णच नाहीत

शहरातील कोरोनाची दुसरी लाट पोलिस व महापालिका प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे आटोक्‍यात आली आहे. बुधवारी शहरात अवघे 14 रुग्ण वाढले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे तीन, 16, 17, 21, 24, 25 हे प्रभाग वगळता उर्वरित सर्वच प्रभागांमध्ये बुधवारी एकही रुग्ण आढळला नाही. शहरातील नागरिकांनी कोरोनासंबंधीच्या नियमांचे तंतोतंत पालन करायला सुरू केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आल्याचे पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी सांगितले. (the number of corona patients in rural solapur is increasing)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT