कोरोनाला त्याने हरविले, मात्र आता कसरत दवाखान्याच्या बिलासाठी! Canva
सोलापूर

कोरोनाला त्याने हरविले, मात्र आता कसरत दवाखान्याच्या बिलासाठी!

कोरोनाला त्याने हरविले, मात्र आता कसरत दवाखान्याच्या बिलासाठी!

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सर्वांसाठी नेहमीच धडपड करणाऱ्या कुलभूषण शांतीनाथ विभूते यांनी कोरोनालाही हरविले आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या लढाईत आर्थिक ओढाताण सुरू आहे.

सोलापूर : प्रश्‍न गावाचा असो की सर्वसामान्य नागरिकाचा, हाती घेतलेला प्रश्‍न तडीस नेण्याची त्याच्यामध्ये कमालीची जिद्द अनेकांनी पाहिली. महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक समितीचे (Maharashtra State Jain Minority Committee) अध्यक्ष म्हणून त्यांनी समाजासाठी नि:स्वार्थी भावनेने काम करत मोलाचे योगदान दिले आहे. सर्वांसाठी नेहमीच धडपड करणाऱ्या कुलभूषण शांतीनाथ विभूते (Kulbhushan Vibhute) (रा. मुंगशी-वाळूज, ता. बार्शी) यांनी कोरोनालाही (Covid-19) हरविले आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या (Corona) लढाईत आर्थिक ओढाताण सुरू आहे. दवाखान्याचे (Hospital) बिल अदा करण्यासाठी ते, त्यांचा मित्र परिवार, समाज आणि कुटुंब कसरत करत आहे. कुलभूषण यांना मदतीचा हात देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढे येण्याची आवश्‍यकता आहे.

विभूते यांना 15 ऑगस्ट रोजी कोविडसदृश लक्षणे दिसू लागली. त्या रात्री त्यांना बार्शीत ऍडमिट करण्यात आले होते. 19 ऑगस्टला त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोलापुरातील खासगी रुग्णालयात हलविले. 15 ऑगस्ट ते आतापर्यंत विभूते यांनी कोरोनाला पराभूत केले आहे. हलाखीच्या परिस्थितीशी झगडा करणाऱ्या विभूते यांची उपचारासाठी आर्थिक अडचण होत आहे. सध्या उसनवारी सुरू आहे. कुलभूषण यांच्या पत्नी शीतल यांनी आर्थिक मदतीसाठी श्री सन्मती सेवादल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष मिहिरभाई गांधी यांच्याकडे प्रयत्न केले. त्यांच्या आवाहनानुसार मदत मिळाली. तब्बल 28 दिवस दवाखान्याचा खर्च भागवताना आलेली मदत आता संपली आहे. उपचारासाठी आणखी मदतीची आवश्‍यकता आहे. महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष विभूते यांनी समाजासाठी नि:स्वार्थी भावनेने काम करत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदत करावी, असे आवाहन गांधी यांनी केले आहे. विभूते हे वैरागचे "सकाळ'चे बातमीदार आहेत.

मदतीसाठी बॅंक खात्याचा तपशील -

Shri Sanmati Seva Dal B.A.S.

IDBI Bank, Akluj

IFSC: IBKL 0000 469.

A/c No: 0469102000006422

रक्कम पाठविल्यावर स्क्रीन शॉट व संपूर्ण नाव, गाव याबद्दलची माहिती 9637073395 या नंबरच्या व्हॉटस्‌ऍपवर कळवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT