HSC Result Esakal
सोलापूर

HSC Result : कला शाखेच्या दहा महाविद्यालयांचा घसरला टक्का!

माळशिरस तालुक्यातील शैक्षणिक स्थिती; कला शाखेसाठी धोक्याची घंटा

सकाळ वृत्तसेवा

माळीनगर : यंदाच्या बारावीच्या परीक्षेत माळशिरस तालुक्यातील कला शाखेच्या दहा कनिष्ठ महाविद्यालयांचा निकालाचा टक्का गतवर्षीच्या तुलनेत घसरल्याचे चित्र आहे. कला शाखेसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

माळशिरस तालुक्यात कला शाखेची २७ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. नुकताच निकाल जाहीर झालेल्या परीक्षेसाठी तालुक्यातून कला शाखेसाठी एक हजार १९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात एक हजार १७१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी एक हजार ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तालुक्यातील काही महाविद्यालयांनी शंभर टक्के निकाल कायम राखला आहे, तर काहींच्या निकालात वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र, कलेच्या दहा महाविद्यालयांचा निकाल ४ ते ३० टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

कला शाखेत प्रवेश घेण्याचा ओघ कमी

विद्यार्थ्यांचा एकूणच व्यावसायिक शिक्षणाकडे सध्या ओढा आहे. त्यांचे पालकही विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने जागरूक झाले आहेत. त्यामुळे पारंपरिक शिक्षणाकडे प्रवेश घेण्याचा विद्यार्थी व पालकांचा कल राहिला नाही. अनेक विद्यार्थी मेडिकल, इंजिनिअरिंगला जाण्यासाठी विज्ञान शाखेस प्राधान्य देतात.

कर रचनेतील नवीन तरतुदींमुळे काही विद्यार्थी वाणिज्य शाखा चोखाळतात. मात्र, कला शाखा घेऊन पुढे काय करायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना सतावतो आहे. पूर्वी कला शाखा घेऊन बारावीला चांगले गुण मिळवून डी.एड. करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असायचा. मात्र, कित्येक वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही.

शिक्षक होण्यासाठी असलेल्या पात्रता परीक्षांमुळे त्यातील क्लिष्टता वाढली. परिणामी विद्यार्थ्यांनी त्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे डी.एड., बी.एड. कॉलेजला घरघर लागल्याचे पाहायला मिळत आहे. सामान्य परिस्थितीतील विद्यार्थी दहावीनंतर आयटीआय, किमान कौशल्य करून रोजगाराच्या संधी शोधताना दिसतात.

कला शाखेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची दिशाभूल

खास करून काही अनुदानित कला कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी संबंधित शिक्षक विद्यार्थ्यांना नानातऱ्हेची आमिषे दाखवतात. कला शाखेतून शिक्षण घेतल्यास पुढे एमपीएससी, यूपीएससी करून तहसीलदार, उपजिल्हाधिकारी होता येते, असे विद्यार्थ्यांना सांगितले जाते.

पोलिस भरती, तलाठी संवर्गाची परीक्षा देता येते, शिक्षक होता येते, असे सांगून शिक्षक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गळ घालतात. विशेषतः दहावीनंतर कला शाखेत मुलींनी प्रवेश घेण्यासाठी त्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सायकल देण्याचे प्रलोभन दाखवले जाते.

दहावीला कमी गुण मिळालेले व ज्यांचे पालक अशिक्षित आहेत असे विद्यार्थी शोधून शिक्षक त्यांच्या दारापर्यंत जाऊन प्रवेश करताना दिसतात. त्यावेळी विद्यार्थ्यांनी वर्षभर शाळेत न येता थेट वार्षिक परीक्षेला आले तरी चालेल, असा सल्लाही त्यांना दिला जात असल्याचे समजते.

कला शाखेच्या शिक्षकांची नोकरी टिकविण्यासाठी धडपड

अनुदानित कला कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश कमी झाल्यास नोकरीत अर्धवेळ होण्याची भीती या शिक्षकांना वाटते. त्यासाठी ते येनकेन प्रकारे कला शाखेचे फायदे विद्यार्थ्यांच्या मनात ठसविताना दिसतात. या शाखेतील शिक्षकांची मुले-मुली मात्र विज्ञान शाखा निवडून पुढे इंजिनिअर, डॉक्टर बनली आहेत. काहींची मुले परदेशात गेली आहेत. कला शाखेतील शिक्षकांच्या मुलांनी कला शाखेतून करिअर केल्याचे अभावानेच दिसून येते.

बारावीचा कला विभागाचा निकाल घसरलेल्या महाविद्यालयांची तुलनात्मक टक्केवारी

महाविद्यालयाचे नाव २०२३ २०२४

  • शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज ८३.६९ ७३.१७

  • महर्षी प्रशाला, यशवंतनगर ९६.५५ ९२.७२

  • दि मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर ९१.३० ८१.६३

  • आर्टस्‌ अँड कॉमर्स कॉलेज, माळशिरस ९०.६३ ६१.११

  • गोपाळराव देव प्रशाला, माळशिरस ९६.४२ ९३.१८

  • सहकार महर्षी विद्यालय, वेळापूर ८८.१५ ८०.०

  • रत्नप्रभादेवी मोहिते पाटील कन्या प्रशाला, नातेपुते १०० ९०.०

  • सहकार महर्षी शंकरराव मोहिते कॉलेज, नातेपुते ८८.६३ ८३.६३

  • घुगरदरे प्रशाला, नातेपुते ८८.८८ ८७.८७

  • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कॉलेज, माळशिरस ९७.०५ ८७.८७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

Mira-Bhayandar: तो हिंदी भाषिक व्यापारी नडला म्हणून मनसे कार्यकर्ता भिडला, 'त्या' व्हायरल व्हिडिओमागची स्टोरी काय?

SCROLL FOR NEXT