Corona
Corona Media Gallery
सोलापूर

ओसरतेय कोरोनाची लाट! आज शहरात 40, ग्रामीणमध्ये आढळले 1355 रुग्ण

तात्या लांडगे

आज दोन हजार 132 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

सोलापूर : शहर-जिल्ह्यात आज 12 हजार 883 संशयितांमध्ये एक हजार 355 बाधित आढळले आहेत. तर शहरातील तीन तर ग्रामीणमधील 29 रुग्णांचा कोरोनाने (Covid-19) बळी घेतला आहे. कडक लॉकडाउननंतर (Lockdown) कोरोनाची लाट ओसरू लागली आहे. आज दोन हजार 132 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. (The prevalence of corona is decreasing in Solapur city and district)

कडक लॉकडाउनपूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहर-जिल्ह्याची रूग्णसंख्या तीन हजारांपर्यंत पोहचली होती. मात्र, जिल्हा व महापालिका, पोलिस प्रशासनाच्या प्रयत्नातून कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. शहरात आज तीन हजार 135 जणांची कोरोना चाचणी पार पडली. त्यात 40 जण पॉझिटिव्ह आले असून दुसरीकडे 96 जण बरे होऊन घरी परतले. आता शहराची रूग्णसंख्या 27 हजार 846 झाली असून एक हजार 341 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आता ऍक्‍टिव्ह रूग्णांची संख्या 825 वर आली आहे. 25 हजार 680 जण कोरोनातून बरे झाले आहेत. आज एक, तीन, चार, नऊ, दहा, 14, 16, 19, 20 या प्रभागात एकही रूग्ण आढळला नाही. तसेच ग्रामीणमधील नऊ हजार 748 संशयितांमध्ये एक हजार 355 जण पॉझिटिव्ह आढळले. दिलासादायक बाब म्हणजे मागील काही दिवसात प्रथमच रूग्णसंख्या दीड हजाराच्या आत आली आहे. परंतु, मृत्यूदर कमी होत नसल्याची चिंता आहे. ग्रामीण भागातील दोन हजार 36 रूग्ण आज बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत ग्रामीण भागात एक लाख 15 हजार 738 रूग्ण आढळले असून त्यातील 98 हजार 184 जण बरे होऊन घरी परतले आहेत. आतार्यंत दोन हजार 393 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

पंढरपूर, माळशिरसमध्ये सर्वाधिक ऍक्‍टिव्ह रुग्ण

आज अक्‍कलकोट तालुक्‍यात 62, करमाळ्यात 203, मंगळवेढ्यात 48, उत्तर सोलापुरात 20, सांगोल्यात 146 रूग्ण आढळले आहेत. दुसरीकडे बार्शीत 164 तर माळशिरस तालुक्‍यात 166 रूग्ण आढळले असून दोन्ही तालुक्‍यात प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला आहे. माढ्यात 213 रूग्ण आढळले असून सात रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मोहोळ तालुक्‍यात 82 रूग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्‍यात 229 रूग्ण वाढले असून सहा रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 22 रूग्ण आढळले असून पाच जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दुसरीकडे ग्रामीणमध्ये सध्या 15 हजार 161 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात सर्वाधिक दोन हजार 551 रूग्ण माळशिरस तालुक्‍यात असून दुसऱ्या क्रमांकावर पंढरपूर तालुक्‍यात दोन हजार 294 रूग्ण आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT