RTE  Esakal
सोलापूर

लॉकडाउन संपल्यानंतरच "आरटीई' प्रवेश !

लॉकडाउन संपल्यानंतरच आरटीई ची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे

तात्या लांडगे

सोलापूर : मोठ्या नामांकित महाविद्यालयांमध्ये मोठी फी भरून शिक्षण घेता न येणाऱ्या मुलांना "आरटीई' अंतर्गत (RTE Admission) मोफत प्रवेश दिला जातो. सोलापूर जिल्ह्यातील 326 शाळांमध्ये दोन हजार 231 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून पहिल्या टप्प्यात एक हजार 738 मुलांची निवड झाली आहे. मात्र, कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेने प्रवेश प्रक्रिया रखडली असून लॉकडाउन (Lockdown) संपल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होणार आहे. (The RTE admission process will be implemented only after the lockdown is over)

राज्यातील नऊ हजार 432 शाळांमध्ये 96 हजार 984 विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत मोफत शिक्षण मिळणार आहे. यावर्षी राज्यातून दोन लाख 22 हजार 29 विद्यार्थ्यांनी मोफत प्रवेशासाठी अर्ज केले होते. काही दिवसांपूर्वी या प्रवेशाची पहिली लॉटरी निघाली. मात्र, कोरोनाची दुसरी लाट गडद झाल्यानंतर 23 एप्रिल पासून राज्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली. राज्यातील करण्याची परिस्थिती सुधारत आहे. परंतु, मृत्यूदर अजूनही आटोक्‍यात आलेला नाही. त्यामुळे 1 जूननंतर कडक संचारबंदी संपणार की आणखी वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर कडक संचारबंदी संपल्यानंतर आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार आहे. मागच्या वर्षी मार्चपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. प्रवेशासाठी पालकांना संबंधित शाळेमध्ये जावे लागते. मात्र, सध्या सर्व शाळा बंद असल्याने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी न झाल्याने ही प्रवेश प्रक्रिया कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर सुरू होणार आहे.

लॉकडाउन संपल्यानंतर "आरटीई'ची प्रवेश प्रक्रिया

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात कडक संचारबंदी लागू आहे. ही संचारबंदी संपल्यानंतर "आरटीई'ची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.

- संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सोलापूरची स्थिती

  • "आरटीई'तील एकूण शाळा : 326

  • प्रवेशाच्या एकूण जागा : 2,231

  • पहिल्या लॉटरीत निवड : 1,738

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT