लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार! मंगळवेढा येथे गुन्हा दाखल Sakal
सोलापूर

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार! मंगळवेढा येथे गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार! मंगळवेढा येथे गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

आकाश कलाप्पा केदार (रा. डोणज) या संशयित आरोपीविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवेढा (सोलापूर) : "मी तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या मुलासह मी तुला सांभाळतो, स्वतंत्र खोली करून ठेवतो' असे म्हणून 30 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका संशयित आरोपीविरुद्ध ता. मंगळवेढा पोलिस ठाण्यात (Mangalwedha Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (The woman lodged a complaint against the accused at Mangalwedha police station)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संशयित आरोपी आकाश कलाप्पा केदार (रा. डोणज) (Donaj) याने सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरज (Miraj) येथील एका 30 वर्षीय महिलेला 'मी तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या मुलासह मी तुला सांभाळतो. स्वतंत्र खोली करून ठेवतो" असे आमिष दाखवून डोणज गावामध्ये स्वतंत्र खोली करून ठेवले. तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर 'तुला माझे ऐकावेच लागेल, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहेच की' अशी दमबाजी करून तिच्यासोबत 13 एप्रिल 2017 ते 15 नोव्हेंबर 2021 यादरम्यान वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.

यादरम्यान पीडित महिला चार महिन्यांची गरोदर असताना त्याने 'तू पोट खाली कर, मी तुझ्याशी लग्न करतो" असे म्हणून पीडित महिलेला शिवीगाळ व मारहाण करून घरातून हाकलून दिले, अशी फिर्याद पीडित 30 वर्षीय महिलेने दिली. आकाश कलाप्पा केदार (रा. डोणज) या संशयित आरोपीविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजित आवटे (Satyajit Awte) करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT