सोलापूर

ऑनलाईनद्वारे शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती

तात्या लांडगे

आता खुल्या प्रवर्गातून 50 टक्‍के पदांवर शिक्षकांनाच पदोन्नती दिली जाणार आहे.

सोलापूर: जिल्हा परिषदेच्या 193 शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदे रिक्‍त आहेत. 2019 पासून कोणालाही पदोन्नती मिळाली नसून मागासवर्गीय प्रवर्गातील पदोन्नतीलाही न्यायालयातून ब्रेक लागला आहे. त्यामुळे आता खुल्या प्रवर्गातून 50 टक्‍के पदांवर शिक्षकांनाच पदोन्नती दिली जाणार आहे. कोरोनामुळे एकाचवेळी शंभर-दोनशे शिक्षकांना बोलावणे अशक्‍य असल्याने तालुकास्तरावर ऑनलाइन समुपदेशनाद्वारे शिक्षकांना पदोन्नती देता येईल, असा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना पाठविला. त्यानुसार आता 9 ऑगस्टला निवडी होणार आहेत.

मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यापूर्वी जिल्हाभरातील सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांना रिक्‍त पदांची माहिती दिली जाणार आहे. मात्र, सोयीच्या ठिकाणची शाळा न मिळाल्याने अनेकजण पदोन्नतीत भाग घेत नाहीत, हा नेहमीचाच अनुभव आहे. त्यामुळे रिक्‍त पदांच्या तिप्पट शिक्षकांना बोलावून घेतले जाते. शासनाच्या निर्बंधांमुळे (कोरोनामुळे) सध्या तेवढ्या शिक्षकांना एकाचवेळी, एकाच ठिकाणी बोलावता येत नाही. त्यामुळे त्या शिक्षकांना तालुकास्तरावर बोलावून घेणे, त्याठिकाणी मोठी स्क्रिन लावली जाणार आहे.

ऑनलाइनद्वारे त्यांचे समुपदेशन करणे, सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र शिक्षकांची यादी प्रसिध्द करणे, त्यांना रिक्‍त पदांची माहिती देणे आणि शेवटी त्यांच्या पसंतीक्रमानुसार सोयीच्या ठिकाणी नियुक्‍ती देणे, अशी कार्यवाही त्यावेळी केली जाणार आहे. 2012 नंतर शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार 2019 मध्ये पदोन्नती मिळाली. त्यानंतर कोरोनामुळे पदोन्नतीचा विषय प्रलंबितच राहिला होता. आता तो या आठवड्यात मार्गी लागेल, असा विश्‍वास स्वामी यांनी व्यक्‍त केला.

'त्या' शिक्षकांची विभागीय चौकशी सुरुच

प्राथमिक शिक्षण विभागातील सुमारे 60 शिक्षकांनी बनावट व बोगस कर्णबधिर, दिव्यांचे प्रमाणपत्र सादर करून मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळविली. आरोग्य विभागाच्या अहवालानंतर त्या सर्वच शिक्षकांची चौकशी स्थानिक पातळीवर झाली. त्यानंतर त्यांची पुण्यातील ससून रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी व्हावी, अशी शिफारस करण्यात आली. तरीही, पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. अजूनही त्या शिक्षकांची विभागीय स्तरावर चौकशीच सुरु असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. विभागीय चौकशीनंतर निश्‍चितपणे त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले.

संजयकुमार राठोड यांनीही चांगले काम केले असून त्यांच्या जागेवर येणाऱ्या नव्या शिक्षणाधिकाऱ्यांना प्रलंबित कामाची माहिती होण्यासाठी आज मंगळवारी आढावा बैठक ठेवली आहे. शिक्षकांच्या पदोन्नतीचे काम अंतिम टप्प्यात असनू त्यांना चार-पाच दिवसांत मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळेल.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT