महापालिका निवडणुकीसाठी आता 102 प्रभाग ! Canva
सोलापूर

महापालिका निवडणुकीसाठी आता 102 प्रभाग !

महापालिका निवडणुकीसाठी आता 102 प्रभाग !

वेणुगोपाळ गाडी

राज्यातील 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका आता एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहेत.

सोलापूर : राज्यातील 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका (महापालिका निवडणुका) आता एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) बुधवारी काढलेल्या अधिसूचनेत तसे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सोलापूर महापालिकेत 26 ऐवजी 102 प्रभाग राहणार आहेत. प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचेही निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

सोलापूरसह बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी - निजामपूर, पनवेल, मीरा - भाईंदर, पिंपरी - चिंचवड, पुणे, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड - वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर या महापालिकांची मुदत 2022 मध्ये संपणार आहे. 2017 मध्ये महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने झाली होती. राज्य शासनाच्या नव्या धोरणानुसार आता एकसदस्यीय प्रभागरचना राहणार आहे. त्यानुसार लवकरच मुदत संपणाऱ्या महापालिकांबाबत निवडणूक आयोगाने अध्यादेश जारी केला आहे. आगामी निवडणुकीसाठी 2011 ची लोकसंख्या विचारात घ्यावी, मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करावा, असे या अध्यादेशात म्हटले आहे.

पूर्वीच्या प्रभाग पद्धतीमुळे पक्षाच्या एका तगड्या उमेदवाराचा फायदा उमेदवारांना होत होता, त्यामुळे विजयाच्या जवळ जाणे सहज शक्‍य होत होते. मात्र, आता एकसदस्यीय प्रभागामुळे सर्वच उमेदवारांचा कस लागणार आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला आपली कसोटी पणाला लावावी लागणार आहे. या नव्या निर्णयाचा लाभ नेमका महाविकास आघाडीला होणार की सत्ताधारी भाजपला होणार? याचा अंदाज बांधला जात आहे.

सोलापूर महापालिकेची सद्य:स्थिती

  • शहरात आठ झोनअंतर्गत 26 प्रभाग

  • एकूण प्रभागांमधील नगरसेवकांची संख्या 102

  • शहरातील एकूण 24 प्रभागांमध्ये प्रत्येकी चार नगरसेवक

  • प्रभाग क्रमांक 25 व 26 मध्ये प्रत्येकी तीन नगरसेवक

  • नव्या बदलानुसार प्रत्येक नगरसेवकासाठी असणार स्वतंत्र प्रभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT