kitchen garden.jpg 
सोलापूर

विदेशी मसाल्यांच्या दुर्मिळ झाडांच्या संग्रहातून "त्यांनी" फुलवली किचन गार्डन 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः शहरातील बसवेश्‍वर नगरातील प्रा.आदील मुन्शी यांनी देशी व विदेशातील मसाला वनस्पतीची लागवड करीत त्यांचा संग्रह केला आहे. या संग्रहाद्वारे तयार केलेली किचन गार्डन वैशिष्ट्यपूर्ण बनली आहे. अगदी रोजच्या स्वयंपाकापासून ते पिझ्झा बर्गरसाठी लागणाऱ्या विदेशी मसाल्यांची झाडे त्यांच्या संग्रहात आहेत. 

बसवेश्‍वर नगरामध्ये प्रा.आदील मुन्शी हे गेल्या काही वर्षापासून छंद म्हणून दुर्मिळ झाडांचा संग्रह करतात. त्यांनी अगदी छंद म्हणून किचन गार्डन हा प्रकार विकसीत केला. त्यामध्ये काही मसाल्याची झाडे लावली आहेत. विदेशातील विशेषतः इटालीयन मसाल्याची झाडे त्यांनी मागवली आहेत. पिझ्झा बर्गरमध्ये वापरली जाणारी बेसील, ऑरगॅनो, शाईम, रोझबेरी ही मसाल्याची झाडे त्यांनी भारतीय वातावरणात वाढवली आहेत. पाणी व योग्य देखभालीमुळे ही सर्व झाडे त्यांच्या गार्डनमध्ये उत्तम पध्दतीने वाढत आहेत. विदेशातील झाडे भारतीय वातावरणात वाढत नाहीत हा गैरसमज त्यांनी दूर केला आहे. पिझ्झा व बर्गरासाठी लागणारे अस्सल मसाले झाडासह त्यांच्याकडे असल्याने जाणकार देखील चकीत होतात. 

कडीपत्ता अद्रक, गवती चहा, पालक, कोथिंबिर, मिरची, पुदीना, ओवा अशी देशी झाडे त्यांच्या किचन गार्डनमध्ये आहेत. या झाडांच्या संग्रहामध्ये असलेली झाडे सर्व शेजाऱ्यांच्या देखील उपयोगी पडतात. स्विस चार्ट हे विदेशी पालकासारखा असलेल्या प्रकाराचे झाड त्यांच्याकडे आहे. त्यामध्ये लाल, पिवळा व हिरवा रंगाचे तिनही प्रकार त्यांनी वाढवले आहेत. त्यांची एक खिडकी केवळ कॅक्‍टसच्या विवीध प्रकारांनी फुलली आहे. 
त्यांंच्या रेसीडेन्सीमध्ये पार्किंगच्या मोकळ्या जागेतील कोपरा विकसित केला आहे. या कोपऱ्यात शेवग्याचे झाड लावले आहे. शेवग्यांच्या शेंगाची लांबी तीन फुटापेक्षा अधिक असल्याने सर्व रेसीडेन्सी मधील शेजाऱ्यांना त्याचा भरपूर उपयोग होतो. या ठिकाणी वेगळ्या वाणाचे तुळशीचे झाड अत्यंत विशेष आहे. या झाडाला हलवले तर त्याचा सुगंध आसमंतात पसरतो. या सर्व झाड़ांना नियमित पाणी मिळते राहील यासाठी त्यांनी ठिबक सिंचन करून पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे अगदी कडक उन्हाळ्यात देखील ही झाडे व्यवस्थित वाढतात. या सोबत त्यांनी रेसीडेन्सीमध्ये असलेल्या संरक्षण भींतीवर जाळ्या बसवून त्यावर विदेशातील फुलांच्या वेली लावण्याची तयारी केली. त्यासाठी त्यांनी अनेक विदेशी फुलांची झाडे संकेतस्थळावरून माहिती काढून मागवली आहेत. त्यांच्याकडे असलेला मसाले उत्पादनाच्या झाडांचा हा संग्रह दुर्मिळच आहे. 
महाविद्यालयाच्या शारिरीक शिक्षण खात्याचे संचालक असताना त्यांनी हा संग्रह उभारला. मागील वर्षी ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या घरातील झाडे, ट्रेमधील रोपे व रेसीडेन्सीच्या बागेत ते व्यस्त असतात. अनेक प्रकारच्या नविन संकल्पना ते साकारत असतात. त्यांनी रेसीडेन्सीच्या सर्व मोकळ्या जागा व भिंती अगदी झाडांच्या कुंड्या व वेलींनी हिरव्यागार केल्या आहेत. त्यांच्या या आवडीला रेसीडेन्सीमधील इतर रहिवाशी देखील त्यांना उत्स्फुर्त साथ देत असतात. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Municipal Election : धुळ्यात भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी 'महायुद्ध'; ६० जागांसाठी तब्बल ५५० इच्छुक मैदानात!

Silent Heart Attacks in Women: छातीत दुखत नाही, तरी हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितला महिलांमधील लपलेला धोका

Latest Marathi News Live Update : भारत आणि श्रीलंका महिला संघात आज पाचवा टी२० सामना

Koregaon Bhima Vijay Stambh : कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पाच हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त; सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे नजर!

Palghar News : तीन महिने उलटूनही नुकसान भरपाई नाही; ई-केवायसीच्या अडथळ्यांमुळे मोखाड्यातील शेतकरी कर्जबाजारी!

SCROLL FOR NEXT