सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात तीन लाख जणांकडे आरोग्य सेतू

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू मोबाईल ऍप्लिकेशन लॉंच केले आहे. आतापर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्यातील तीन लाख 920 नागरिकांनी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड केल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. हे ऍप मराठी, हिंदीसह एकूण 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी माहिती सर्वांपर्यंत पोचावी आणि सर्वांनी याबाबत सजग राहावे, यासाठी हे ऍप मार्गदर्शन करेल. आरोग्य सेतू ऍप ब्लूटूथ आणि जीपीएस सिस्टिमचा वापर करून कोरोनासंदर्भात मार्गदर्शन करते. जीपीआरद्वारे व्यक्तीचे रिअल टाइम लोकेशन ट्रॅक करण्यात येते. कोणताही कोरोनाग्रस्त व्यक्ती जवळ आल्यास हे ऍप ट्रॅक करणार आहे. सहा फूट अंतरापर्यंत ऍप कोरोनाबाधित व्यक्तीला ट्रॅक करू शकते. 


कोरोना विरोधातील लढाईत लोकांना आरोग्य सेवेशी जोडणे, हा या ऍपचा प्रमुख उद्देश आहे. आयओएस आणि अँड्रॉईड फोनवर हे ऍप डाऊनलोड करता येते. कोरोनाला घाबरू नका, आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करा आणि कोरोनाशी संबंधित माहिती जाणून घ्या. आपल्या आजूबाजूला असलेल्या संक्रमित व्यक्तींची माहिती तसेच प्रत्येक राज्याचे हेल्प डेस्क नंबर आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आरोग्य सेतू ऍप महत्त्वाचे आहे, असेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. हे ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही सिस्टिमवर उपलब्ध आहे. ऍप्लिकेशनच्या साहाय्याने आपण, आपले कुटुंबीय, मित्र यांना विषाणूची बाधा होण्यापासून बचाव करता येणे शक्‍य आहे. या ऍप्लिकेशनमध्ये दिली जाणारी वैयक्तिक माहिती अतिशय सुरक्षित ठेवली जाणार आहे. याचबरोबर या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून पीएम केअर्स निधीमध्ये योगदान देता येते. महाराष्ट्र
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

Breaking: IPL 2026 चं वेळापत्रक बदलणार? RCB चे सामने एम चिन्नास्वामीवर होणार की नाही? आले मोठे अपडेट्स

LPG चं टेन्शन तर काहीच नाही..अजून खरा बॉम्ब ब्लास्ट आहे बाकी; 1 एप्रिलपासून तुमच्या खिशाला लागणार युद्धाची झळ, 'या' 15 वस्तू महागणार

'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवर पुलाव तर तुला जपणार आहेच्या सेटवर चुलीवरचं जेवण, चहा सुद्धा केला बंद!

Latest Marathi Update : युद्धाचा परिणाम झेंडू बाजारावर; दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT