guru vathare.jpg
guru vathare.jpg 
सोलापूर

महानगरपालिकेने कला व नाट्यचळवळीला मदत करण्याची हीच वेळ : कलावंतांनी व्यक्त केली भावना 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः नाट्य चळवळ व कलावंतांना लॉकडाउनच्या संकटानंतर पून्हा व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महानगरपालिकेने इतर शहराप्रमाणे भाडे सवलत देऊन सांस्कृतिक चळवळ सुरळीत होण्यासाठी धोरणात्मक मदत केली पाहीजे असे मत ज्येष्ठ नाट्य संयोजक गुरु वठारे यांनी येथे व्यक्त केले. 

राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलच्या वतीने नाट्य, कला व संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंताना शरदप्रतिभा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. येथील हॉटेल समृध्दच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. 
ते पुढे म्हणाले की, इतर मोठ्या शहराप्रमाणे सोलापुरात थिएटर सुरु करत असताना कोविड नियमानुसार अर्ध्या संख्येची आसने वापरावयाची असल्याने भाडे देखील अर्धेच आकारले पाहिजे. त्याशिवाय डिपॉझिट घेतले जाऊ नये. शहरात नाट्य व सांस्कृतिक चळवळ पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी महानगरपालिकेने मदत केली पाहीजे. एकदा ही चळवळ सुरळीत झाली की, महानगरपालिकेला पूर्ण भाडे घेता येणार आहे. या स्थितीत चळवळ व कलावंत जीवंत राहावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. 
यावेळी व्यासपीठावर महानगरपालिकेचे गटनेते किसन जाधव, माजी सभापती राजन जाधव, मराठी नाट्य परिषदेचे उपनगरीविभाग पदाधिकारी विजयदादा साळुंखे, राष्ट्रवादी सेलचे अध्यक्ष आशुतोष नाटकर, कार्याध्यक्ष जब्बार मुर्शद, सचिव किरण लोंढे आदी उपस्थित होते. 
यावेळी कला क्षेत्रातील कलावंत शशिकांत लावणीस, विजय साळुंखे, अजय दासरी, आनंद खरबस, मोहन आंग्रे, यासीन सय्यद, राजासाब बागवान, साहिर नदाफ, नागेंद्र माणेकरी, श्रीपाद येरमाळकर, वामन बावळे, गुरू वठारे, ऍड. अरविंद अंदोरे, तारासिंग मरोड, माधव पवार, दिपक कलढोणे, सुरेश बहिरवाडे, राजा राजेशचंद्र, विद्या काळे, कमलप्रभा ईंगळे, शोभा बोल्ली, ओमप्रकाश श्रावण, सुशिला व्हनमाळे, संजिवनी काळे, वनिता म्हैसकर, डॉ. मिरा शेंडगे, दिप्ती धोत्रे, मनिषा जोशी, डॉ.राजीव मोहोळकर, कौस्तुभ गोडबोले या कलावंताच गौरव करण्यात आला. या कलावंताना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आशुतोष नाटकर यांनी केले. दानेश सावडगे यांनी आभार मानले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT