Transport Ministers alert! Increase income otherwise 
सोलापूर

परिवहन मंत्र्यांचा इशारा ! उत्पन्नात वाढवा अन्यथा... 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाची लालपरी वाढते अपघात अन्‌ प्रवाशांच्या घटलेल्या संख्येमुळे अडचणीत सापडली आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी महामंडळाच्या वाहतूक शाखेने आता 1 मार्च ते 30 एप्रिल या काळात उत्पन्न वाढवा हे विशेष अभियान हाती घेतले आहे. त्यानुसार सर्वाधिक उत्पन्न मिळविणाऱ्या आगारांना आता दरमहा दोन लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. 

हेही नक्‍की वाचा : म्हणून तो गाडी चालवायचा 

एसटी महामंडळाची आवस्था सध्या अंगापेक्षा भोंगा मोठा अशी झाली असून दरवर्षी सुमारे दिड हजार कोटींचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत आहे. सरकारकडून विविध सवलतीच्या अनुदानातून लालपरीची वाटचाल सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर परिवहन मंत्री ऍड. परब यांनी आता विशेष अभियान हाती घेतले आहे. महामंडळाने सुरू केलेल्या उत्पन्न वाढवा विशेष अभियानांतर्गत एका महिन्यात (मागील वर्षाच्या तुलनेत) सर्वाधिक उत्पन्न मिळविणाऱ्या आगारांना बक्षिस दिले जाणार आहे. या अभियानाअंतर्गत जे आगार निकृष्ट कामगिरी करतील, त्या आगारातील अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. महामंडळाच्या 250 आगारांची प्रदेशनिहाय विभागणी करण्यात आली असून प्रत्येक प्रदेशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम क्रमांकांच्या आगारास दरमहा दोन लाख रुपये तर द्वितीय क्रमांकाच्या आगारास दिड लाख आणि तृतीय क्रमांकासाठी एक लाख रुपये दरमहा दिले जाणार आहेत. महामंडळाच्या 31 विभागापैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांनाही याप्रकारचे बक्षिस देण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी जाहीर केला. 

अधिकाऱ्यांवर अशी होणार कारवाई 
हे अभियान प्रयोगिक तत्वावर 1 मार्च ते 30 एप्रिल या दोन महिन्यांत राबविले जाणार आहे. या स्पर्धात्मक अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांना बक्षिस तर निकृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारातील संबंधित अधिकाऱ्यांना शिक्षा केली जाणार आहे. त्यानुसार संबंधित आगारातील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल राखून ठेवणे, त्यांची गैरसोयीच्या ठिकाणी बदली करणे अशी शिक्षा केली जाईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT