bail accident.jpg 
सोलापूर

लऊळजवळ पुलाच्या अर्धवट कामाच्या ठिकाणी बैल घेऊन जाणारा ट्रक पलटी

वसंत कांबळे

कुर्डू(सोलापूर)ः बैल घेऊन जाणाऱ्या टेम्पोला लऊळजवळ ट्रकने कट मारल्याने पलटी होऊन एक बैल जखमी झालेल्यांची घटना आक्‍टोबर शुक्रवारी(ता.2) रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या मध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नसुन पाच बैल व टेम्पोतील सहाजण बचावले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूरहुन सहा बैल घेऊन एम एच 42 एक्‍यु 2264 हा बीडकडे जात होता. पहाटेच्या पाचच्या सुमारास लऊळ हद्दीतील कुर्मदास मंदीराकडे जाणाऱ्या रोडजवळ मोठ्या पुलाचे काम चालु असलेल्या पुलाजवळ आले असता पंढरपूरकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने टेम्पोला कट मारला. टेम्पोला झोला बसल्याने टेम्पो पलटी झाला. यात असणाऱ्या सहा बैला पैकी एका बैलाचे शिंग मोडल्याने जखमी झाला व बाकीचे सहा व्यक्ती व पाच बैल हे या अपघातामधुन बचावले आहेत. 

पुलाच्या अर्धवट असलेल्या कामामुळे ता. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी शिराळ (मा) येथील मृतदेह घेऊन निघालेल्या नातेवाईकांच्या इंडीगो कारचा ही याच ठिकाणी गाडी अर्थवट रोडवरुन खाली जाऊन अपघात झाला. त्यामध्ये गाडीतील मृताची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. हे अर्धवट काम त्वरीत पुर्ण करण्याची मागणी वाहन चालक यांच्या कडुन होत आहे. 

अर्धवट पुलाचे काम पूर्ण करावे 
या अर्धवट असलेल्या पुलाचे काम त्वरित पूर्ण करून तो संपूर्ण रित्या वाहतुकीसाठी खुला करावा व अपूर्ण काम ठेवल्याबद्दल संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईल ने आम्ही आंदोलन करु 
- दिलीप जोशी, उपसरपंच लऊळ  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

Ferritin Test: ‘नॉर्मल’ हिमोग्लोबिनमुळे गाफील राहू नका! ‘फेरिटिन’ टेस्टही आहे तितकीच महत्त्वाची

Latest Marathi News Live Update : कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांसाठी ११ लाखांची मदत

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

SCROLL FOR NEXT