उजनी धरण sakal
सोलापूर

उजनीतून सोडण्यात येणारे पाणी बंद करा : विक्रांत पाटील

भविष्यात होणारी पाणीटंचाई टाळण्यासाठी उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करून प्रथमत: धरण पूर्ण क्षमतेने भरून घ्यावे, अशी मागणी विक्रांत पाटील यांनी केली

भीमाशंकर राशीनकर

अनगर (सोलापूर) : जिल्ह्यात सध्या सर्वदूर पाऊस पडत असताना उजनीच्या कालव्याला पाणी सोडण्याची गरज नसतानासुद्धा संबंधित विभागाच्या गहाळ कारभारामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसताना पाणी सोडले जात आहे. भविष्यात होणारी पाणीटंचाई टाळण्यासाठी उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करून प्रथमत: धरण पूर्ण क्षमतेने भरून घ्यावे, अशी मागणी लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली आहे.

अधीक्षक अभियंता धीरज साळे यांची भेट घेऊन विक्रांत पाटील यांनी ही मागणी केली आहे. विक्रांत पाटील म्हणाले, की उजनी धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये पाऊस कमी असल्यामुळे उजनी धरण अजूनही पूर्ण क्षमतेने भरले नाही. सोलापूर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून सर्वदूर पाऊस असून ओढे, नाले, तलाव तुडुंब भरलेले आहेत. सीना नदीलाही पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी सध्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची आवश्‍यकता नाही. तरीही जलसंपदा विभागाच्या गलथान कारभारामुळे उजनीच्या कालव्यांमधून, बोगद्यातून शेतीसाठी पाणी सोडले जात आहे. या पाण्याचा शेतकऱ्यांना कोणताच उपयोग होत नसून पाण्याचा अपव्यय होत आहे. भविष्यात शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणारी टंचाई पाहता प्रथमतः उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरून घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करून करावे, असे श्री. पाटील म्हणाले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हा बॅंकेचे संचालक भारत सुतकर, सरचिटणीस प्रशांत बचुटे, पेनूरचे उपसरपंच रामदास चवरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर चवरे, उपसरपंच विजय कोकाटे, युवा नेते सचिन चवरे, कार्याध्यक्ष विकास कोकाटे, सरपंच पोपट जाधव, सरपंच संदीप पवार, सिद्धेश्वर बचुटे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

Bhau Flex Kadha Campaign : महायुती सरकारला ‘महाराष्ट्र विद्रूपीकरण पुरस्कार’ द्या; काँग्रेसने महायुती सरकारला केले लक्ष्य

Latest Marathi News Live Update: एन. चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्ट्सचे मुंबई हायकोर्टात आव्हान

Maharashtra Digital Governance 174 Systems : सरकारी कार्यालयांमधील चकरा थांबणार! मुख्यमंत्र्यांकडून १७४ डिजिटल प्रणालींचे लोकार्पण; प्रजासत्ताक दिनापासून राज्यात 'झिरो ब्युरोक्रसी' आणि पेपरलेस प्रशासन!

AgriStack Farmer ID Maharashtra : महाराष्ट्राची देशात मोठी भरारी! १.४४ कोटी शेतकऱ्यांची 'अ‍ॅग्रीस्टॅक' नोंदणी पूर्ण; उर्वरित शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कसा काढावा? कृषिमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन

SCROLL FOR NEXT