Planting 
सोलापूर

लॉकडाउन लावलाय सत्कारणी ! "या' शिक्षकाने लावली दोनशे झाडे

सूर्यकांत बनकर, करकंब

करकंब (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील चार महिन्यांपासून लॉकडाउन चालू आहे. या कालावधीत अनेकजण घरी बसून राहणे पसंत केले तर अनेकांनी आपले छंद जोपासले. शैक्षणिक वर्ष चालू होऊन दोन महिने होत आले तरी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत भोसे (ता. पंढरपूर) येथील प्राथमिक शिक्षक सुनील अडगळे यांनी वेळेचा सदुपयोग करताना सार्वजनिक ठिकाणी तब्बल दोनशे झाडे लावली आहेत. 

लॉकडाउनच्या काळात वेळ कशात घालवावा, असा प्रश्‍न अनेकांना पडलेला होता. अनेक महिन्यांच्या या कालावधीत अनेकांनी ऑनलाइन संवाद, छंद, मुलांचा अभ्यास व बागकामाला वेळ दिला. स्वतःपुरत्या गोष्टी न करता पर्यावरणासाठी काही करावे, असा प्रयत्न देखील झाला. कोणी बेघर-गरिबांना धान्य वाटप केले, अत्यावश्‍यक साहित्यांची वाटप केली. आपल्या परिसरात अनेक जागा रिकाम्या असतात. तसेच रस्त्याच्या बाजूला देखील जागा मोकळी असते. तसेच या वर्षी पाऊस देखील चांगला पडत असल्याने भोसे येथील प्राथमिक शिक्षक सुनील अडगळे यांनी हिरवाई रुजवण्याचा प्रयत्न सुरू केला. 

परिसरातील उजाड माळरान, मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपणाची गरज दिसून आली. तसेच या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कमी - अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे एकीकडे वृक्षारोपणासाठी असलेले अनुकूल वातावरण आणि शाळा बंद असल्याने हाती असलेला रिकामा वेळ यामुळे श्री. अडगळे यांनी हाती टिकाव, खोऱ्या आणि काही झाडांची रोपे घेऊन परिसरातील शाळा, वीज कार्यालय, पोलिस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी सार्वजनिक ठिकाणे गाठली. तेथे स्वतःच खड्डे घेऊन वृक्षारोपण केले. काही ठिकाणी त्यांनी रस्त्याच्या दुतर्फाही झाडे लावली. या वेळी भेटलेल्या विद्यार्थी आणि पालकांना त्यांनी ऑनलाइन शिक्षण आणि कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत धडेही दिले. त्यांनी एकूण दोनशे रोपे लावून लॉकडाउनमधील वेळ सत्कारणी लावला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT