मंगळवेढा-सोलापूर रस्त्यावर अपघात! दोघे जागीच ठार Canva
सोलापूर

मंगळवेढा-सोलापूर रस्त्यावर अपघात ! दोघे जागीच ठार

मंगळवेढा-सोलापूर रस्त्यावर अपघात ! दोघे जागीच ठार

हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

आजीच्या अस्थि विसर्जनापूर्वीच अविवाहित तरुण नातवाचा अपघाती मृत्यू झाल्याने या मंगळवेढा तालुक्‍यातील नंदेश्वर गावावर शोककळा पसरली आहे.

मंगळवेढा (सोलापूर) : मयत आजीच्या तिसऱ्या दिवशी अस्थि विसर्जनासाठी बेगमपूर येथे जात असताना मंगळवेढा - सोलापूर रोडवर टेम्पोशी झालेल्या धडकेत (Accident) दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. आजीच्या अस्थि विसर्जनापूर्वीच अविवाहित तरुण नातवाचा अपघाती मृत्यू झाल्याने मंगळवेढा तालुक्‍यातील नंदेश्वर गावावर शोककळा पसरली आहे. (Two youths died on the spot in an accident on Mangalvedha-Solapur road-ssd73)

याबाबत मिळालेली माहिती अशी, की अरविंद ज्ञानेश्वर मेटकरी (वय 21) याच्या आजी भामाबाई दाजी मेटकरी (वय 66) हिचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते. आज (शनिवारी) आजीच्या तिसऱ्या दिवसाचा विधी पूर्ण झाल्यानंतर बेगमपूर येथील भीमा नदी पात्रात अस्थि विसर्जनासाठी बंडू पांडुरंग गोरे (वय 42) व अरविंद ज्ञानेश्वर मेटकरी (वय 21) हे दोघे दुचाकी (एमएच 13 डीएल 1178) वरून जात होते. मात्र सकाळी 9.45 च्या दरम्यान सोलापूरहून कोल्हापूरकडे जाणारा टेम्पो (एमएच 10 सीआर 6681) चा चालक मोहसीन गौस शेख (रा. निमशिरगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) हा भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने येऊन दुचाकीला समोरून धडक दिली. त्यामध्ये अरविंद ज्ञानेश्‍वर मेटकरीचा जागेवरच मृत्यू झाला तर बंडू गोरे हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला उपचारासाठी मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

अपघातानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे 50 हजारांचे नुकसान झाले आहे. हा अपघात मुख्य रस्त्यावर झाल्याने वाहनांची कोंडी झाली. वाहनधारक व बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी तत्काळ वाहनाची कोंडी सोडवण्याच्या सूचना केल्या. या अपघाताची फिर्याद सोपान मेटकरी यांनी दिली असून, तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निंबाळे हे करीत आहेत.

मृत अरविंद मेटकरी हा अविवाहित असून संगणक क्षेत्रात तज्ज्ञ होता. तर बंडू गोरे हा शेती करत होता. आजीच्या मृत्यूने दु:खात असणाऱ्या मेटकरी कुटुंबीयांना तरुण नातूचाही अपघाती मृत्यू झाल्याने मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर नंदेश्‍वर गावावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एक याचिका देशातील प्रत्येकासाठी निर्णायक… आगीत मुलगी गमावलेल्या वडिलांची लढाई, सरकारनं नाही पण बापानं करुन दाखवलं

Karnataka Congress Crisis : काँग्रेसमधील 'वादळ' एका क्षणात शांत? सिद्धरामय्या–शिवकुमार यांच्या नाश्त्याच्या बैठकीनंतर दिल्लीत नेमकं काय घडलं?

गौतम गंभीरकडून हर्षित राणाला प्रत्येक फॉरमॅटमध्ये संधी का दिली जाते? खरं कारण समोर, 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल...

Hinjewadi Accident : मद्यधुंद चालकाने तीन भावंडांना चिरडले; हिंजवडी आयटी पार्कमध्ये बसचा अपघात, दोन पादचारी जखमी

Politics Jamkhed : जामखेडचा विकास ही माझी जबाबदारी : मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही; राम शिंदे आमचे हेडमास्तर !

SCROLL FOR NEXT