Sand Portrait
Sand Portrait 
सोलापूर

"या' विद्यार्थ्याने वाहिली आपल्या कलाविष्काराने शहीद जवानाला अनोखी श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : भारतीय हद्दीतील गलवान खोऱ्यात झालेल्या चीनच्या हल्ल्यात 16 बिहार रेजिमेंटचे कर्नल बी. संतोष बाबू यांना वीरमरण आले. देशासाठी बलिदान दिलेल्या या हुतात्म्याला सोलापूरचा 19 वर्षीय चित्रकला विद्यार्थी प्रतीक तांदळे याने सॅंड पोर्ट्रेटद्वारे अनोखी श्रद्धांजली वाहिली. 

प्रतीक तांदळे याने सोलापुरातील बाळेपासून दोन किलोमीटरवर असलेल्या खेडपाटी गावात ही प्रतिमा साकारली. त्याने 15 बाय 20 फुटांचा पृष्ठभाग पांढऱ्या रांगोळीने भरून काढला. त्यावर वाळू व दगडांच्या साह्याने (सॅंड पोर्ट्रेट) कर्नल बी. संतोष बाबू यांची प्रतिमा साकारली. तीन दिवसांपासून त्याची ही तयारी सुरू होती. प्रतिमा साकारल्यानंतर त्याने बी. संतोष बाबू यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

प्रतीकचे शिक्षण इयत्ता बारावी सायन्स झाले असून, लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्याने त्याने चित्रकला विषयात करिअर निवडले. तो कुचन चित्रकला महाविद्यालयात चित्रकला फाउंडेशन कोर्स करत आहे. त्याला पेन्सिलीने पोर्ट्रेट बनवायची आवड आहे. मात्र वाळू शिल्पे व लाकडापासून व इतर साहित्यापासूनही विविध प्रतिमा साकारले जातात, याबाबतही त्याला उत्सुकता आहे. प्रतीकने सॅंड पोर्ट्रेट हा नवीन प्रकार आत्मसात केला. तो गहू व इतर धान्यापासून व्यक्तिचित्रे व कार्टून्स काढत असे. लॉकडाउनच्या काळातही तो असे विविध प्रयोग करत आहे. 

प्रथमच बनवले सॅंड पोर्ट्रेट 
15 जून रोजी भारतीय हद्दीतील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 भारतीय जवान ठार झाले. त्यात बी. संतोष बाबू यांचा समावेश होता. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी प्रथमच सॅंड पोर्ट्रेट बनवले. चित्रकला फाउंडेशन कोर्स पूर्ण झाल्यानंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेणार आहे. 
- प्रतीक तांदळे, 
विद्यार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs LSG Live Score: अर्धा संघ माघारी परतला, पण पुरनची एकाकी झुंज; अवघ्या 20 चेंडूत झळकावलं अर्धशतक

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

Table Tennis: मनिका बत्राने रचला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला टेबल-टेनिसपटू

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

SCROLL FOR NEXT