Baby 
सोलापूर

डॉक्‍टरांना झाली कन्यारत्नाची प्राप्ती; त्यांच्याच स्टाईलने केले तिचे असे स्वागत... 

बालाजी फुगारे

चळे (सोलापूर) : स्त्री म्हणजे शक्ती आणि तिची आराधना करणे म्हणजे पुण्य, असे पुराणात सांगितले आहे. पोटी एक मुलगी जरूर असावी, तिच्या जन्मावर आनंदाने बर्फी वाटावी, बेटी धनाची पेटी असे बाबाला गर्वाने वाटावे, असाच अभिमान चळे (ता. पंढरपूर) येथील डॉ. सुहास मोरे यांना वाटत आहे. त्यांना रविवारी (ता. 12) कन्यारत्न प्राप्त झाले. त्या कन्येच्या जन्माचा स्वागत सोहळा मोठ्या दिमाखाने डॉ. सुहास मोरे व मोरे परिवाराने साजरा केला. 

सोमवारी (ता. 13) गावातील मुख्य चौकामध्ये फटाके फोडून मुलीच्या जन्माचा स्वागत सोहळा साजरा करण्यात आला. तसेच डॉ. सुहास मोरे यांच्या क्‍लिनिकमध्ये जवळपास 150 ते 200 लोकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मोठमोठ्या शहरांमध्ये मुलीच्या जन्माचे स्वागत होत असताना ग्रामीण भागामध्ये सुद्धा डॉक्‍टरांनी व मोरे परिवाराने मुलीच्या जन्माचे स्वागत अशा अनोख्या पद्धतीने केल्याने मुलींचा सन्मान वाढण्यास निश्‍चितपणे मदत होणार आहे. 

डॉ. मोरे यांचे पुणे येथील शेवाळवाडी येथे 2016 पासून हॉस्पिटल सुरू आहे. त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. हॉस्पिटलची सुरवात झाल्यापासून शिवजयंती, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, बालदिन, महिला दिन या दिवशी त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, रक्तगट तपासणी, महिलांची हिमोग्लोबिन तपासणी असे उपक्रम करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच डॉ. मोरे यांनी चळे येथे क्‍लिनिक सुरू करून येथील रुग्णांची सेवा करत आहेत. रविवारी त्यांनी कन्या रत्नप्राप्तीचा आनंद मोफत आरोग्य तपासणी करून साजरा केला. या अनोख्या पद्धतीने मुलीच्या जन्माचे स्वागत केल्याने गावातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. 

याबाबत डॉ. मोरे म्हणाले, काल आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले. तिच्या आगमनाचे स्वागत म्हणून आमच्या क्‍लिनिकमध्ये मोफत आरोग्य तपासणी केली आहे. सर्वांनीच मुलीच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे. ही तपासणी करताना सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते. 

चळेचे ग्रामस्थ पांडुरंग काळे म्हणाले, मी दवाखान्यामध्ये आलो असता डॉक्‍टरांना मुलगी झाल्यामुळे मोफत तपासणी करण्यात आली. सर्वांनी असा आदर्श घ्यावा. मुलीच्या जन्माचे स्वागत झाले पाहिजे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT