Varanasi fourth all-India Veerashaiva Marathi Literary Conference inaugurated 
सोलापूर

वाराणसीत चौथ्या अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उदघाटन

सकाळ वृत्तसेवा

वाराणसी : ""अध्यात्म हे वरच्या तर विज्ञान हे खालच्या पातळीवर असते,त्यामुळे अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड आवश्‍यक आहे'',असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले.

श्री जगद्गुरु विश्वआराध्य गुरुकुल शतमान उत्सव श्री जगद्गुरु विश्वआराध्य जनकल्याण प्रतिष्ठान वाराणसी द्वारा आयोजित चौथ्या अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य संमेलनाला शनिवारी वाराणसी येथील जंगमवाडी मठामध्ये सुरुवात झाली. त्यावेळी श्री. चाकूरकर बोलत होते. 

संमेलनाचे अध्यक्ष शांतीतीर्थ स्वामी चाकूरकर, स्वागताध्यक्ष वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य स्वामीजी, डॉक्‍टर भीमाशंकर स्वामी, आमदार बसवराज पाटील ,माजी मंत्री विनायक पाटील, प्राध्यापक डॉक्‍टर शे.दे.पसारकर, डॉ. विजया तेलंग, डॉ. सतीश बडवे यांच्यासह अन्य संशोधक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काशी पिठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात हा उद्घाटन सोहळा झाला. अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी जर मानवाने प्राप्त केल्या तर त्यामाध्यमातून खरा जीवनाचा अर्थ समजेल आणि जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद उपभोगता येईल असेही श्री. चाकूरकर यांनी सांगितले. 

डॉ. शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, ""अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे वीरशैव साहित्याची निश्‍चितच दखल घेतील .त्यासाठी दरवर्षी संमेलन घेण्यात येईल. आणि त्यासाठी लागणारा निधी काशी पीठ व भक्तगणांच्या माध्यमातून उभारला जाईल .आतापर्यंत जुन्या ग्रंथावर शोध निबंध आणि संशोधन झाले होते. आता नवीन ग्रंथांवरसुद्धा संशोधन होणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी डॉक्‍टर पसारकर यांचे योगदान मोठे आहे.'' 

""वीरशैव धर्म हा देशातील प्राचीन धर्म आहे. त्यालाच बोलीभाषेत लिंगायत असेही म्हणतात. महाराष्ट्राचा इतिहास ,संस्कृती व साहित्याचे अवलोकन केले असता दोन्ही नावे एकच आहेत अशी सर्व महाराष्ट्राची भावना आहे. या धर्मात जरूर दोन भेद आहेत. पंचाचार्य यांना मानणारा वर्ग सनातन म्हणून ओळखला जातो तर महात्मा बसवेश्वर आदी शिवशरनांना मानणारा वर्गही सुधारकी असून पुरोगामी मानला जातो. कोणत्या धर्मात अगदी जगातला सर्वात मोठा धर्म ख्रिश्‍चन धर्म किंवा मुस्लीम धर्मात दोन विचारधारा तसेच बौद्ध ,जैन आणि अनेक धर्मात पंथात अशी विचारसरणी आढळते. त्यामुळे वीरशैव लिंगायत हे दोन शब्द महाराष्ट्रात मराठी साहित्यात व महाराष्ट्रीय ज्यांना मनात वेगळे न समजता एकच म्हणणारे बहुसंख्य आहेत'', असे शांतितीर्थ संगय्या स्वामी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल सर्जे यांनी केले. 

परिसंवादात मान्यवरांचा सहभाग 
पहिल्या परिसंवादात "काशीपिठाचे प्रबोधनकार्य" या विषयावर डॉक्‍टर शे.दे. पसारकर यांचे "काशी पिठाचे वागमयीन कार्य", शांती तीर्थ स्वामी यांचे "काशी पीठ आणि महाराष्ट्र ",उषा पसारकर यांचे "काशी विश्वनाथ गुरुकुल : विहंगमावलोकन, प्राध्यापक ज्योति स्वामी यांचे "वीरशैव नियतकालिकांत विभूतीवैभवचे योगदान " प्राध्यापक प्रमोद वगरकर यांचे" वीरशैव संतकवींनी केलेले धर्मप्रबोधन" आणि डॉक्‍टर अपर्णा जिरवणकर यांचे वीरशैवांचे संस्कृत साहित्य: एक अवलोकन" या विषयावर मार्गदर्शन झाले .पंडित शिवाप्पा खडके अध्यक्षस्थानी होते. सूत्रसंचालन प्राध्यापक चेतना गौरशेटे यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT