Vitthal-Rukmini
Vitthal-Rukmini 
सोलापूर

विठुराया धावला पंढरपूरकरांसाठी! मंदिर समितीतर्फे उपजिल्हा रुग्णालयासाठी "इतक्‍या' लाखांच्या मशिनरी देणार

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारे पंढरपूर येथे मदत केल्यानंतर आता श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने उपजिल्हा रुग्णालयासाठी तीन हाय फ्लो नेसल ऑक्‍सिजन मशिन विश नेसल अँड कॅन्युला मशिन देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येकी सुमारे दोन लाख 82 हजार रुपयांचे एक याप्रमाणे एकूण तीन मशिनसाठी सुमारे आठ लाख 46 हजार खर्चून या मशिन्स देण्यात येणार आहेत. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्‍य होणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. यापूर्वी पीपीई किट, निराधारांना फूड पॅकेट्‌स, भटक्‍या जनावरांसाठी चारा, रुग्णांच्या विलगीकरणासाठी भक्त निवास अशा प्रकारे मंदिर समितीने मदत केलेली आहे. हाय फ्लो नेसल ऑक्‍सिजन मशिन विथ नेसल अँड कॅन्युला मशिन तालुक्‍यात सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाने मंदिर समितीकडे मागणी केली होती तसेच उपविभागीय अधिकारी यांनी देखील यासंदर्भात सूचना केली होती. 

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. जोशी यांनी कोरोना संसर्गाच्या सुरवातीपासून सर्व मदतकामात हिरीरीने पुढाकार घेऊन तातडीने सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. हाय फ्लो नेसल ऑक्‍सिजन मशिन विथ नेसल अँड कॅन्युला मशिनची आवश्‍यकता लक्षात घेऊन त्यांनी तातडीने सहअध्यक्ष श्री औसेकर महाराज तसेच अन्य सदस्यांच्या सोबत दूरध्वनीवरून चर्चा केली आणि तीन मशिन देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी धर्मादाय आयुक्तांची मान्यता घेणे आवश्‍यक होते. त्यानुसार तातडीने त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यांनीही त्वरित मंजुरी दिली. त्यामुळे लवकरच पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाला आवश्‍यक असलेली तीन मशिन मिळणार आहेत. त्यामुळे एकप्रकारे विठुरायाच पंढरपूरकरांच्या मदतीसाठी धावला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने लॉकडाउन जाहीर केल्यापासून पंढरपूर प्रशासनास त्यांच्या मागणीनुसार आतापर्यंत उपजिल्हा रुग्णालयास सुमारे 82 हजार रुपये किमतीचे पाचशे पीपीई किट, रुग्णवाहिका, पंढरपूर शहरातील निराधार नागरिकांना तीन महिने दररोज दोन वेळा फूड पॅकेट्‌स वाटप, शहरातील भटक्‍या जनावरांना हिरवा चारा वाटप, तालुक्‍यातील बार्डी येथील वनक्षेत्रातील वन गायींना आणि अन्य वन्य जिवांना चारापाण्याची सोय, परजिल्ह्यातील आणि परराज्यातील मजुरांची निवास आणि भोजन व्यवस्था, विलगीकरण कक्षासाठी वेदांता, व्हिडीओकॉन आणि एमटीडीसी जागेतील अशी एकूण तीन भक्त निवासे प्रशासनास उपलब्ध करून दिली. 

कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या स्टाफसाठी प्रांत कार्यालय पंढरपूर तसेच नगरपालिका पंढरपूर यांना 25 लिपिक व सेवक उपलब्ध करून दिले. शहर पोलिसांच्या मदतीसाठी 50 कमांडो पथक दिले. राज्य शासनास आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांची मदत पाठवण्यात आलेली आहे. एकंदर आतापर्यत मंदिर समितीने सामाजिक उत्तरदायित्व व मानवतावादी भूमिकेतून सुमारे दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT