Vitthal Rukmini Mandir
Vitthal Rukmini Mandir 
सोलापूर

विठ्ठल मंदिर आंदोलनावर बहुजन वंचित आघाडी ठाम; ऍड. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली करणार आंदोलन

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल - रुक्‍मिणीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी तातडीने उघडावे; अन्यथा कोणत्याही परिस्थितीत वारकऱ्यांसोबत आंदोलन केले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळीच लक्ष घालून मंदिर उघडावे, अशी मागणी करत, वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेना आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंद चंदनशिवे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना मांडली. 

लॉकडाउनपासून पंढरपूचे श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर बंद आहे. मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेनेने केली आहे. याच मागणीसाठी 31 ऑगस्ट रोजी विठ्ठल मंदिरासमोर ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो वारकरी आंदोलन करणार आहेत. विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनावर बहुजन वंचित आघाडी ठाम असून कोणत्याही परिस्थितीत आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

श्री. चंदनशिवे म्हणाले, लॉकडाउनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून पंढरपूरचे विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर बंद आहे. बंदमुळे येथील व्यापारी आणि छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत. राज्यात दारूची दुकाने आणि मॉल उघडण्यास सरकारने विनाअट परवानगी दिली आहे; परंतु धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली जात नाही. गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी येत्या 31 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विविध वारकरी संघटनांच्या वतीने पंढरपुरात आंदोलन केले जाणार आहे. 

आंदोलनाला विविध वारकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनामध्ये राज्यभरातील सुमारे एक लाख वारकरी आणि भाविक सहभागी होणार आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीवर आम्ही बहिष्कार टाकला आहे. आता ही आमची निकराची लढाई आहे. आता थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर आज वारकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. या वेळी वारकरी सेनेचे बुरघाटे महाराजांसह बहुजन वंचित आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT