pushpvrushti.jpg
pushpvrushti.jpg 
सोलापूर

बबनराव आवताडे व सिध्देश्‍वर आवताडे यांचे पुष्पवृष्टीने केले स्वागत 

हुकूम मुलानी

मंगळवेढा(सोलापूर) ः कोरोना सारख्या जागतिक महामारी ने दमछाक झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना देखील सध्या कोरोनाबद्दल भीती वाटू लागली. अशा परिस्थितीत जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक बबनराव आवताडे व खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे हे कोरोनावर मात करून सुखरूप परत आल्यामुळे समर्थकांनी त्यांचावर पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत केले. 

मंगळवेढ्यातील जि.प.व प.सं व निम्याहून अधिक ग्रामपंचायतीसह सहकार क्षेत्रावर आवताडे गटाचे एकहाती वर्चस्व आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अवताडे परिवारामध्ये सातत्याने कार्यकर्ते समर्थकांची सातत्याने वर्दळ होती. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक बबनराव आवताडे व खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह कुटुंबातील काही सदस्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनी वैद्यकीय उपचार घेत घेऊन कुटुंबातील सदस्यांचे विलगीकरण केले. 

दरम्यानच्या काळात त्यांच्या समर्थकांनी ते तात्काळ बरे व्हावेत म्हणून ग्रामदेवता कडे प्रार्थना केल्या.कोरोना वरील उपचार घेऊन सुखरूप परत घरी आले त्यावेळी त्यांच्यावर समर्थकांनी पुष्पवृष्टी तर महिला भगिनी औक्षण करून स्वागत केले. खरेदी विक्री संघ, कृषी उद्योग संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्था नावारूपाला आणताना खरेदी-विक्री संघातील इंधनाबददल जी विश्वासार्हता स्व. कि.रा मर्दां यांच्या काळात होती ती आजतागायत कायम ठेवण्याचा प्रयत्न अवताडे परिवाराने केला. उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने अनेकाशी संबंध येत असल्याने यशस्वी उपचारानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. 

आपल्या कुटुंबाला कोरोनापासून रोखावे.
नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी कोरोना चे संकट गांभीर्याने घेऊन डॉक्‍टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सोशल डिस्टन्स व मास्क,सॅनीटायझर वापर करावा.आपल्या कुटुंबाला कोरोनापासून रोखावे. 
- सिद्धेश्वर आवताडे अध्यक्ष खरेदी विक्री संघ 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जच्या स्टार खेळाडू चहरला झाली गंभीर दुखापत, सामन्यानंतर कोचने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT