education.jpg 
सोलापूर

ऑनलाइन शिक्षण व अभ्यासक्रम कपातीनंतर आता शिक्षण क्षेत्रासमोर कोणते पर्याय ठरतील महत्वाचे ? वाचा सविस्तर 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून अनेक तांत्रिक अडथळे पार करत अध्यापन व अध्ययनाची प्रक्रिया सुरु राहीली आहे. या ऑनलाइन शिक्षणाने विद्यार्थ्याचे शाळेशी नाते टिकवून धरण्याचे काम कोरोना संकटात केले आहे. अभ्यासक्रम कपातीच्या घोषणेनंतर पुढील काळात उजळणी व जादा तासातून शिक्षण प्रक्रिया सुरळीत करण्याच्या पर्यायाचे नियोजन शिक्षण क्षेत्रासाठी महत्वाचे ठरणार आहे. 

शाळा बंद पण शिक्षण चालू या माध्यमातून कोरोना संकटात घराबाहेर न पडता सुरक्षिततेच्या कारणासाठी ऑनलाइन शिक्षण वापरण्यात आले. मोबाईल तंत्रापासून दूर असणाऱ्या बहुतांश शिक्षकांना या प्रक्रियेसाटी तंत्रस्नेही बनावे लागले. त्यामध्ये काही प्रमाणात वेळेचा अपव्यय झाला. पण शिक्षकांनी या प्रक्रियेत उतरून विद्यार्थ्यापर्यंत किमान अध्ययन घटक पोहोचवण्याचे प्रयत्न केले. 

शिक्षकापेक्षा विद्यार्थ्याची सर्वात मोठी अडचण झाली. या शिक्षणासाठी लागणारा अँड्राईड मोबाईल स्वतंत्रपणे खरेदी करणे पालकांच्या हाताबाहेर गेले होते. कोरोना संकटामुळे एकतर बहुतांश पालकांना त्यांच्या आर्थिक उत्पन्नापासून वंचित व्हावे लागले. एका कुटुंबामध्ये एकच अँड्राईड मोबाईल असण्याचे प्रमाण सर्वाधीक आहे. या कुटुंबाना केवळ शिक्षणासाठी दुसरा अँड्राईड मोबाईल घेणे अशक्‍य झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या साठी मोबाईल हाताळण्याचा कालावधी अगदी मर्यादीत होता. तसेच या कामासाठी लागणाऱ्या नेटवर्कच्या अडचणी ग्रामीण भागात सर्वाधिक होत्या. कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळामध्ये शिक्षकांनी चांगली कामगिरी वैयक्तीक लक्ष देऊन केली. अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना याबाबत अडचणी होत्या. या पध्दतीत अभ्यासाच्या दृकश्राव्य सादरीकरणाने विद्यार्थ्याच्या स्मृतीमध्ये हा अध्ययन घटक जोडला गेला. 
तरीही नववी व दहावीच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाबाबत अधिक गांभीर्याने विचार केला जात आहे. या दोन्ही वर्गाचे अभ्यासक्रम व त्याला जोडलेली बोर्डाची परिक्षा यामुळे शिक्षण तज्ञ त्याबाबत काळजीपुर्वक लक्ष घालीत आहेत. 

ऑनलाईन शिक्षण हा परिस्थितीजन्य उपाय
कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षण हे केवळ शाळांचे विद्यार्थ्यांशी नाते जोडून ठेवणारे परिस्थितीजन्य उपाय म्हणून असलेले माध्यम होते. विद्यार्थी व शिक्षकांच्या संवादातून होणारे नियमित शिक्षण ही संकल्पना मुलभुत आहे.  
- संतोष पाटील, शिक्षण तज्ञ तथा मुख्याध्यापक सिध्देश्‍वर विद्यालय सोलापूर 

पुढील काळात उर्वरित अभ्यासक्रमाबद्दल नियोजन
घरात अडकलेल्या विद्यार्थी व शिक्षकांसमोर ऑनलाइन हाच पर्याय होता. आता अभ्यासक्रमात कपात झाली आहे. नियमित शाळा सुरु झाल्यानंतर उर्वरित अभ्यासक्रमाबद्दल नियोजन होईल. त्यातून शालेय शिक्षणाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पुढील काळात याचबाबत शिक्षण क्षेत्रातून नियोजन होईल. 
- रेवणसिध्द रोडगीकर, विद्यासचिव, जिल्हा मुख्याध्यापक संघ सोलापूर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav ने मला खूप मेसेज केले होते...' बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक दावा; नेमकं काय म्हणाली?

VIRAL VIDEO : एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये धक्कादायक घटना; मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशांवर केली लघवी, लज्जास्पद व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : जळगाव जामोद येथून बदली झालेल्या शिक्षकांच्या रुजूकरणासाठी ठिय्या आंदोलन...

Air India Express Offers : नववर्षाची विमान प्रवाशांसाठी मोठी ऑफर! Air India Express ची Pay-Day Sale सुरू; तिकिटांवर बंपर सवलत

पुण्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला अजितदादांनी दिलं तिकीट, NCP नेत्याच्या दोन मुलांना वेगवेगळ्या पक्षांची उमेदवारी

SCROLL FOR NEXT