Grain 
सोलापूर

बार्शीनंतर आता वैरागमध्ये "इतक्‍या' लाखांचा रेशनचा गहू, तांदूळ जप्त

कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात रेशनच्या धान्याचा काळाबाजार आता उघड होऊ लागला आहे. बार्शी, उपळाईनंतर आता वैरागमध्ये हा प्रकार उजेडात आला आहे. सरकारी स्वस्त धान्य दुकानातून विकला जाणारा गहू, तांदूळ काळ्या बाजारात विकण्याच्या उद्देशाने जमवणाऱ्या वैरागच्या मार्केट यार्डमधील एका आडत दुकानावर धाड टाकून दोन लाख 63 हजार 250 रुपयांचा 351 पोत्यांमधील रेशनचा गहू आणि तांदूळ जप्त करण्यात आला आहे. 

या प्रकरणी वैरागच्या आडत व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. ही कार्यवाही बार्शी उपविभागीय पोलिस कार्यालय व वैराग पोलिस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने शनिवारी (ता. 8) रोजी सायंकाळी केली. याबाबत वैराग पोलिसात संशयित आडत व्यापारी सतीश खेंदाड याच्याविरोधात पोलिस नाईक संदेश पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे. बार्शी तालुक्‍यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानातील गहू आणि तांदूळ काळ्या बाजारात विकले जात असल्याचे दिसून आले होते. नुकतेच पनवेल या ठिकाणी तालुक्‍यातील गहू, तांदूळ पकडण्यात आला होता. याच्या चौकशीसाठी तालुक्‍यात गोपनीय तपासणी करत असताना वैरागमध्येही रेशनचा गहू आणि तांदूळ काळ्या बाजारात विकला जात असल्याची माहिती पोलिसांना समजली. 

वैराग पोलिसांच्या मदतीने ही संयुक्त कारवाई करत वैरागच्या मार्केट कमिटीमध्ये असलेला गाळा नंबर 93 येथील सतीश अंबऋषी खेंदाड याच्या आडत दुकानांमध्ये धाड टाकून चौकशी केली असता पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये काय आहे, विचारले असता व्यापाऱ्याने गहू, तांदूळ असल्याचे सांगितले. हा माल कोठून खरेदी केला, असे विचारले असता, माहिती दडवली. याबाबत अधिकृत नोंदी, पावत्या आहेत का? असे विचारले असता याबाबत काहीही नोंदी नसल्याचे व्यापाऱ्याने सांगितले. यानंतर पंचांसमक्ष दुकानातील पोत्यात असलेल्या गहू व तांदळाची पाहणी केली असता हा माल रेशनचा दिसून आल्याने कार्यवाही करण्यात आली.

यामध्ये सुमारे 50 किलो वजनाच्या 257 तांदळाच्या पिशव्यांमध्ये 1 लाख 92 हजार 750 रुपये किमतीचा तांदूळ व 94 पिशव्यातील गव्हाची किंमत 70 हजार 500 रुपये असा एकूण दोन लाख 63 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल काळ्या बाजारात विकण्याच्या उद्देशाने जमा करून ठेवल्याचे दिसून आले. पोलिस व पुरवठा अधिकारी साबळे यांनी दोन पंचांसह पंचनामा केला असता शासकीय धान्याचे शिक्के मारलेले व गव्हर्नमेंट ऑफ पंजाब अशी पोती आढळली. पुरवठा अधिकारी व पोलिसांनी धान्य व दुकानास सील करत या दुकानदारास अटक करून बार्शीच्या न्यायालयासमोर उभे केले असता, त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT