varsha gaikwad 
सोलापूर

सकाळ ब्रेकिंग ! दहावीच्या भुगोल पेपरचा वाढला पेच ? 

तात्या लांडगे

सोलापूर : बारावीनंतर दहावीची परीक्षा अंतिम टप्प्यात असतानाच कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने देशभर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा भूगोल या विषयाचा पेपर तात्पुरता रद्द करण्यात आला. 31 मार्चनंतर पेपर घेण्याचे नियोजन होते, परंतु लॉकडाउन 14 एप्रिलपर्यंत वाढल्याने अद्याप पेपर कधी होणार हे शिक्षण विभागाने स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, पेपर कधी घ्यायचा याचा निर्णय 12 एप्रिलनंतर जाहीर करु, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सकाळशी बोलताना स्पष्ट केले. 

 
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह राज्यातील बहूतांश विद्यापीठांअंतर्गत असलेल्या महाविद्यालयांच्या परीक्षा 17 मार्चपासून सुरु करण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने केंद्र सरकारने लॉकडाउनचा कालावधी वाढविला आणि राज्य सरकारने सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. रेल्वे, एसटी, खासगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करुनही कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे लॉकडाउनचे टप्पे कमी करुन कालावधी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात असून 10 एप्रिलनंतर त्याबाबत निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान, दहावीचा पेपर होईल, असे पुणे बोर्डाने स्पष्ट केले. मात्र, परीक्षा कधी होणार हे जाहीर केलेले नाही. लॉकडाउनचा कालावधी वाढल्यास पेपर रद्द होऊ शकतो, अशी शक्‍यता वरिष्ठ सूत्रांनी व्यक्‍त केली आहे. मात्र, त्याबाबतचा अधिकृत निर्णय शिक्षणमंत्री काही दिवसांत जाहीर करतील, असेही त्यांनी सांगितले. 


12 एप्रिलनंतर निर्णय जाहीर केला जाणार
कोरोना या विषाणूला हद्दपार करण्याच्या हेतूने महाराष्ट्रासह देशभर संचारबंदी लागू असून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे दहावीचा भूगोल विषयाचा पेपर कधी घ्यायचा, याचा निर्णय 12 एप्रिलनंतर जाहीर केला जाणार असून त्याबाबत नियोजन सुरु आहे. 
- वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री 

स्वतंत्र कमिटी स्थापन करण्याच्या हालचाली 
दहावीचे मूल्यांकन बेस्ट ऑफ पाईव्ह पध्दतीने केले जाते. बोर्डाचा पेपर रद्द होण्याची वेळ कधीच आली नसल्यामुळे भूगोल विषयाचा पेपर रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना गुण कशाप्रकारे द्यायचे, हा पेच सोडविण्यासाठी काही मोजक्‍या शिक्षणतज्ज्ञांची कमिटी स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पेपर रद्द झाल्यानंतरच ही कमिटी स्थापन होईल आणि निर्णय देईल. तुर्तास पेपर रद्द करण्याचा निर्णय झाला नसल्याचे पुणे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

ठळक बाबी...
  • 12 एप्रिलनंतर होणार निर्णय होईल : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती 
  • शिक्षकांमधील विविध चर्चांमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम 
  • लॉकडाउनचा कालावधी वाढल्यास पेपर रद्द होवू शकतो : सूत्रांनी वर्तविली शक्‍यता 
  • पेपर रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना कशा पध्दतीने गुण देता येतील, यासाठी कमिटी स्थापन करण्याच्या हालचाली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BREAKING: रोहित शर्मा Lords वर निवृत्ती जाहीर करणार? IND vs ENG तिसरा वन डे सामना शेवटचा, धक्का देणारी Inside Story

VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

Pune Birth-Death Records: जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; पुणे महापालिकेला अधिकार, प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश

RAVINDRA JADEJA: रवींद्र जडेजाचं वनडे करिअर संपणार? 2027 विश्वचषकासाठी डच्चू, अक्षर पटेलला प्राधान्य; अहवालात मोठा दावा

Akkalkot Hannur coordination meet: हन्नूरमध्ये ‘सहविचार सभा’द्वारे चपळगाव गटातील १८ गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; प्रशासन-लोकप्रतिनिधींचा अभिनव समन्वय

SCROLL FOR NEXT