Will Guruji get his salary on time? 
सोलापूर

गुरुजींना पगार वेळेवर मिळेल का?

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लॉकडाउनच्या दिव्यातून मार्ग काढत गुरुजींचा मार्च महिन्याचा पगार अखेर एप्रिलच्या शेवटच्या दिवशी झाला. परंतु, त्यापूर्वी शासनाने एप्रिल महिन्याचा पगार वेळेत व 100 टक्के करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, एप्रिलचा पगार करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे एप्रिलचा पगार तरी वेळेवर होणार का, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. 

मार्चचा पगारासाठी संघटनांचे प्रयत्न 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याप्रमाणे गुरुजींचा मार्च महिन्याचा पगार 25 टक्के इतका कपात करण्यात आला आहे. परंतु, एप्रिलचा पगार हा 100 टक्के द्यावा, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. मार्चचा पगार मिळविण्यासाठी गुरुजींना अनेक दिव्याला सामोरे जावे लागले. अनेक शिक्षक संघटनांनी यासाठी प्रयत्न केला. माध्यमिकच्या काही संघटनांमध्ये तर श्रेयासाठी सोशल वॉरही झाले. परंतु, शेवटी सगळ्यांच्या प्रयत्नाने का होईना मार्च महिन्याचा पगार एप्रिलच्या 29 व 30 तारखेला झाला. 

एप्रिलच्या पगारासाठी पाठपुरावा सुरू 
आता शिक्षक संघटनांकडून एप्रिल महिन्याचा पगार वेळेवर होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी तशा प्रकारचे पत्रही शासनाला दिले आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेला निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा उल्लेखही त्यांनी त्या पत्रामध्ये केला आहे. मात्र, एप्रिलचा पहिला आठवडा सुरू झाला असला तरी अद्यापही त्यासाठी निधी मात्र उपलब्ध झालेला नाही. निधी उपलब्ध झाल्यानंतर पगाराची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे माध्यमिकच्या वेतन पथक कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शासन आता या शिक्षकांच्या पगारासाठी निधी कधी उपलब्ध करून देणार, यावर त्यांचा एप्रिल महिन्याचा पगार कधी होणार, हे अवलंबून आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT