kidnaping case sakal
सोलापूर

विद्यार्थिनीला पळवून नेण्याचा तरुणाचा डाव फसला

चावा घेऊन मुलीने करुन घेतली स्वत:ची सुटका; दोघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

सांगोला : वडिलांचा अपघात झाला आहे, असे खोटे कारण शाळेत (School)सांगून दहावीच्या विद्यार्थिनीला पळवून(Kidnap)नेण्याचा युवकाचा प्रयत्न फसला. ही घटना ता. २० रोजी दुपारी सांगोला (Sangola)तालुक्‍यातील एका गावात घडली असून मुलीने युवकाच्या हाताचा चावा घेऊन स्वतःची सुटका केली. याबाबत मुलीच्या वडिलांनी दोन तरुणाविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.

तालुक्‍यातील एका शाळेत पीडित मुलगी दहावीमध्ये शिकत आहे. ता. २० रोजी मुलगी शिकत असलेल्या शाळेत धनाजी ठोंबरे हा मित्रासोबत गेला. त्यावेळी त्या मुलीच्या वडिलांचा अपघात झाला असून आम्ही मुलीस घेऊन जाण्यासाठी आलो आहे, असे खोटे कारण मुख्याध्यापकांना सांगितले. शाळेच्या शिपायाने मुलीस वर्गातून बोलावून त्या मुलांच्या बरोबर पाठवून दिले. ते सर्वजण मोटारसायकलवरून जाताच प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिपायाने मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन करून खात्री केली असता धनाजी हा खोटे कारण सांगून मुलींला घेऊन गेल्याचे लक्षात आले.

लागलीच मुलीच्या वडिलांनी धनाजीला फोनवरून संपर्क केला. यावेळी त्याने मी मोटारसायकल चालवत आहे. घरी गेल्यावर वडिलांना फोन देतो, असे सांगून फोन कट केला. मुलीने इकडे कुठे असे विचारताच दवाखान्यातील खर्चासाठी घरून पैसे घ्यायचे आहेत, असे सांगितले. यावेळी त्याने सोबत असलेला मित्रास त्याचे घराजवळ सोडले व मुलीस त्याच रोडवर असणाऱ्या एका पाहुण्याच्या घरी आणले. तेथे तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. यावेळी मुलीने आरडाओरडा करत तरुणांच्या हाताला चावा घेऊन स्वतःची सुटका केली. दरम्यान, गावातील काही लोक त्या ठिकाणी आले. त्यांच्याकडील मोबाईलवरून मुलीने वडिलांशी संपर्क करत स्वतःची सुटका करून घेतली. याबाबत मुलीच्या वडिलांनी धनाजी ठोंबरे व श्रीकांत हाके (दोघे रा. काळूबाळूवाडी, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Bhagwangad News : भगवानगडाच्या चतुर्थ महंतपदी कृष्णा महाराज शास्त्री विराजमान होणार; दुष्काळामुळे सोहळा साधेपणाने

Law Courses : विधी अभ्यासक्रमाला मुलींची पसंती; प्रवेशाचे प्रमाण ४३.३८ टक्क्यांवर

IND vs NZ, Schedule: भारताचा T20 संघ न्यूझीलंडला पोहोचला! वैभव सूर्यवंशीसोबत फॅन्सने घेतले सेल्फी, भुवीही कमबॅकसाठी सज्ज

Latest Marathi News Live Update : गोकुळचा निकाल आता फेरमतमोजणीच्या फेऱ्यात, जल्लोषानंतर आकडे बदलले; लेटेस्ट अपडेट वाचा

SCROLL FOR NEXT