सोलापूर

पंढरपुरात नवीन वर्षाच्या दिवशीच भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे तणाव निवळला.

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी (ता.1) पंढरपुरात(pandharpur) भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या(bjp-ncp crisis) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. भाजपचे तुषारे भोसले (acharya tushar bhosale)यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(sharad pawar) यांच्यावर केलेल्या टिकेच्या निषर्धात तुषार भोसले यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न झाला. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची व धराधरी झाली. त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे

मंदिर परिसरात तणाव निर्माण झाला होता. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे तणाव निवळा. दरम्यान, भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे. तर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप मांडवे यांनीही यापुढच्या काळात भाजप नेत्यांना त्यांची जागा दाखवून देवू असे प्रतिउत्तर दिले आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तुषार भोसले शनिवारी (ता.1) नवीन वर्षाच्या निमित्ताने विठ्ठल रुक्‍मिणीच्या दर्शनासाठी सहकुटुंब पंढरपुरात आले होते. दर्शन घेतल्यानंतर भोसले व भाजपचे पदाधिकारी मंदिराच्या व्हीआयपी गेटमधून बाहेर पडत असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांच्यासह काही कार्यकर्ते हातात काळा बुका घेवून श्री.भोसले यांच्या दिशेने जात असतानाच जवळच असलेले भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस माऊली हळणवर यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रोखले.

त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. हा वाद बराच वेळ मंदिरात परिसरात सुरु असल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ मंदिर परिसरात दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली.

राष्ट्रवादीकडून तुषार भोसलेंचा निषेध

दोन दिवसापूर्वी भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तुषार भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त टीका केलीहोती. त्यांच्या या टिकेचा निषेध म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावर काळा बुक्का टाकण्याच्या तयारीत होते. परंतु भाजपच्यापदाधिकार्यांनी त्यांचा हा डाव उधळून लावला.

भाजप पदाधिकाऱ्यांचा आक्रस्ताळेपणा

तुषार भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विषयी टीका केली होती. चुकीच्या पध्दतीने टीका न करता, माहिती घेवून श्री.भोसले यांनी टीका करावी यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी भोसले यांना "तु माझा सांगाती' हे पुस्तक आणि फुटाणे भेट देणार होते. परंतुभाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रस्ताळेपणा करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाच दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. केवळ भाजपच्यापदाधिकाऱ्यांची ही नौटंकी आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संदीप मांडवे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT