पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरच्या हातमागावरील बोधचिन्ह झळकणार "या' देशात 

विजयकुमार सोनवणे


सोलापूर ः जागतिक शांतता समितीच्या वतीने फेब्रुवारी 2020 मध्ये बांगलादेशातील राजशाही शहरात आंतरराष्ट्रीय राजदूत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे बोधचिन्ह सोलापुरात तयार झाले आहे. येथील कलाकार राजेंद्र अंकम यांनी ते हातमागावर बनविले असून, ते या परिषदेत वापरले जाणार आहे. 

ही आहे पहिलीच परिषद 
बांगलादेशात होणारी जागतिक स्तरावरील ही पहिलीच परिषद आहे. 20 ते 22 फेब्रुवारी यादरम्यान ही परिषद होईल. जागतिक स्तरावर वाढलेल्या दहशतवादावर कसे नियंत्रण आणायचे, या संदर्भात या परिषदेत चर्चा होणार आहे. या परिषदेच्या नियोजनासाठी सोलापुरातून प्रा. गणेश चन्ना यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच या परिषदेचा आराखडा तयार केला जाणार आहे. 

यापूर्वी केले दिग्गजांचे पोट्रेट 
श्री. अंकम यांनी यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, संयुक्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह जर्मनी, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या राष्ट्राध्यक्षांचे पोट्रेट तयार केले आहे. या नेत्यांना प्रत्यक्ष भेटून किंवा त्या-त्या देशांतील राजदूतांमार्फत हे पोट्रेट दिले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोट्रेटही त्यांना नुकतेच त्यांनी भेट म्हणून दिले. श्री. मोदी यांनी या कलेची आत्मीयतेने स्तुती केली होती. आता स्मृती इराणी, अमित शहा, प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार, सचिन तेंडुलकर, भारतातील प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा, मित्तल, अदानी, अंबानी आदींचे पोट्रेट विणून त्यांना प्रत्यक्षात भेट देण्याचे नियोजन श्री. अंकम यांनी केले आहे. त्यामध्ये आता या बोधचिन्हाची भर पडली आहे. 

हेही पहा.... (VIDEO)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT