sangli esakal
पश्चिम महाराष्ट्र

ST चालकाच्या मुलाची भरारी; ZP शाळेत शिकलेला वैभव झाला 'फ्लाईंग ऑफिसर'

सैनिक शाळेतील दोन वर्षांमुळे या परीक्षांचे स्वरुपाबद्दल नेमका अंदाज आला होता.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : वाळवे तालुक्यातील (valwe) मर्दवाडीचे वैभव माने (Vaibhav mane) भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसरपदी (flying officer in Indian air force) रुजू होत आहेत. संरक्षण दलाच्या सेवेत रुजू होण्यासाठी २०१७ पासून सलगपणे विविध परीक्षा देत तब्बल सातव्या प्रयत्नात ते भारतीय वायुदलाची (Indian air force) परीक्षा उत्तीर्ण झाले. वायुदलाच्या हैदराबादच्या (Haidrabad) ॲकॅडमीतील वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर ते आता आसाममध्ये (Aasam) रूजू होत आहेत. मर्दवादीतील जिल्हा परिषद शाळा ते हैदराबाद एअरफोर्स ॲकॅडमी असा त्यांचा परिश्रमपूर्वक प्रवास ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी असाच आहे.

सर्वसामान्य मध्यवर्गीय कुटुंबातील मुलांचे स्वप्न एखादी नोकरी पकडून आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे असं मर्यादित असतं. त्यात गैर असं नाही. मात्र त्यातून संरक्षणदलातील अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणे तसं चाकोरीबाहेरचं. वैभव यांचे वडील भगवान एसटीत चालक (ST Driver) तर आई सुनीता गृहिणी.

या दोघांनी वैभव माने यांनी सांगली (Sangli) शिक्षण संस्थेच्या तासगाव येथील दादोजी कोंडदेव सैनिक शाळेत प्रवेश घेताना ते स्वप्न पाहिले. गावातील सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकल्यानंतर ते आष्ट्याला महत्मा गांधी हायस्कूलमध्ये आणि तिथून अकरावी बारावीसाठी तासगावच्या सैनिक शाळेत शिकले.

मात्र बारावीनंतर एनडीएत (NDA) जाण्‍याचे त्यांचे स्वप्न मात्र पूर्ण झाले नाही. मग पुढील पदवीच्या शिक्षणासाठी त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवीसाठी आष्ट्याच्या अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथून ते २०१७ मध्ये पदवीनंतर पुन्हा एकदा त्यांनी सेनादल नेव्ही आणि वायुदलाच्या परीक्षांसाठी प्रयत्न सुरू केले.

सैनिक शाळेतील दोन वर्षांमुळे या परीक्षांचे स्वरुपाबद्दल नेमका अंदाज आला होता. त्यामुळे यश सतत हुलकावणी देत असतानाही सलग सहा परीक्षा दिल्यानंतर सातव्यांदा म्हणजे फेब्रुवारी २०२० मध्ये ते वायुदलातील अधिकारीपदाची एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ते मुलाखतीतही उत्तीर्ण झाले.

त्यानंतर त्यांची हैदराबादच्या ॲकॅडमीत रूजू झाले. नुकतेच म्हणजे गेल्या १८ डिसेंबरला प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची आसाम एअरफोर्स स्टेशनला पोस्‍टिंग झाली आहे. लवकरच ते वायुदलाच्या प्रत्यक्ष सेवेत रुजू होत आहेत. मर्दवाडी ते आसाम असा प्रवास वैभव यांची स्वप्नपूर्ती करणारा आहे. यानिमित्ताने त्यांना वायुदलातील सेवेच्या संधीची कवाडे खुली झाली आहेत. सांगलीचा एक भूमिपुत्र भारतीय वायुसेनेत अधिकारीपदी रुजू होत आहे.

'भारतीय वायुदलाच्या प्रशासकीय विभागात माझी अधिकारीपदी निवड झाली आहे. आसामधील पहिल्या पोस्‍टिंगनंतर देशाच्या कानाकोपऱ्यातील वायुदलाच्या स्टेशनमध्ये यापुढे माझे पदोन्नतीवर पोस्‍टिंग होत राहील. वायुदलातील उच्चपदावर काम करण्याचा माझा संकल्प आहे.'

- वैभव माने, फ्लाईंग ऑफिसर (भारतीय वायुदल)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT