farmer 
पश्चिम महाराष्ट्र

राज्य सरकारचा केंद्राकडे पाठपुरावा....कशासाठी बरं ? 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील महापूर व अवकाळीच्या नुकसान भरपाईसाठी 14 हजार 495 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने 15 ऑक्‍टोबर 2019 मध्ये केंद्र सरकारला सादर केला. तीन महिन्यांनंतर केंद्राने नुकतीच 956 कोटींना मंजुरी दिली, मात्र त्यापैकी एक दमडाही मिळालेली नाही. नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने स्वत:च्या फंडातून सात हजार 800 कोटी वितरित केले आहेत. बळिराजाच्या कर्जमाफीसाठी पैशांची जुळवाजुळव सुरू असून केंद्राने 15 हजार कोटी तत्काळ द्यावेत, असे पत्र मदत व पुनर्वसन विभागाने पाठविले आहे. 


राज्यातील सर्व शासकीय विभागांत व बॅंकांमध्ये नव्या आर्थिक वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर मार्च एंडची लगबग सुरू झाली आहे. बॅंकांचा एनपीए कमी व्हावा, खरीप हंगामात शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळावे यादृष्टीने मार्चपूर्वी कर्जमाफीची रक्‍कम जमा करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅंका व राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी एक हजार 100 लेखापरीक्षकांमार्फत विकास सोसायट्यांमधील कर्जखात्याची पडताळणी सुरू असून 15 जानेवारीपर्यंत सर्व माहिती देण्याचे निर्देश सहकार विभागाने लेखापरीक्षकांना दिले आहेत. 


राज्याची स्थिती 
पूरग्रस्तांसाठी मदतीचा प्रस्ताव 
7,295 कोटी 
अवकाळीच्या मदतीचा प्रस्ताव 
7,200 कोटी 
केंद्राकडून मंजूर रक्‍कम 
956 कोटी 
केंद्राकडे प्रलंबित रक्‍कम 
13,539 कोटी 
स्टेट फंडातून वितरित रक्‍कम 
7,800 कोटी 


दोन लाखांवरील थकबाकीदारांसाठी 'ही' योजना 
राज्याच्या डोक्‍यावर पावणेसात लाख कोटींच्या बाहेरील कर्जाचा बोजा आहे. दरम्यान, महापुर व अवकाळीतील नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारने स्वत:च्या फंडातून सात हजार 800 कोटींचा खर्च केला आहे. त्यापैकी 956 कोटींना मंजुरी मिळाली असून त्यापैकी केंद्राकडून अद्याप दमडाही मिळालेला नाही. केंद्राकडून मागणी केलेली सर्व रक्‍कम मिळाल्यानंतर राज्य सरकार दोन लाखांवरील थकबाकीदारांसाठी बिनव्याजी ओटीएस योजना आणण्याच्या तयारीला लागले असल्याची चर्चा आहे. पूर्वीच्या सरकारने ओटीएस योजना लागू केली होती, त्यामध्ये आता बदल करुन थकबाकीदारांना व्याजमाफी देण्याचा विचार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT