cashew rate increased for this year in ratnagiristory of one woman selling a banana her son crack exam of RTO officer in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

केळी विकणाऱ्या कुटुंबातील मुलानं मिळवलेलं यश प्रेरणा देणारं

सकाळ वृत्तसेवा

मिरज (सांगली) : कष्टा विना फळ नाही अस म्हटंल जात ते तितकच खरं करून दाखवण्याची किमया मिरजेतील अग्निशामक केंद्रा नजिक केळी विक्री करणा-या जगदेवी मासाळकर यांचा मुलगा गणेश मासाळकर यांनी करुन दाखवले आहे. तो नुकताच वाहतूक निरीक्षक पदावर विराजमान झालेला आहे. अपार मेहनत करून मुलाला वाढवले तो अधिकारी म्हणून समोर उभा ठाकल्याने तिलाही सुखद धक्का बसला. अत्यंत सामान्य कुटुंबात आणि प्रतिकूल परिस्थितीत प्राप्त केलेले हे यश तरूणाईस प्रेरणादायी ठरले आहे.

शहरातील कुंभार गल्लीत एका घरात मासाळकर कुटुंब वास्तव्यास आहेत. केळी विक्री करणे या कुटुंबाचा पिढीजात व्यवसाय. आई जगदेवी मासाळकर या नियमित केळी घेऊन अग्निशामक दला नजिक विक्रीसाठी बसलेल्या असतात. उन-पावसाची तमा न बाळगता कुटूंबाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून त्या हा व्यवसाय करतात. त्यांना दोन मुली आणि दोन मुले अशी चार लेकरं. घरात सारे अल्पशिक्षित तरीही मुलांनी शिकावं अशी जगदेवींची अपेक्षा होती. दोन मुलांपैकी गणेश हुशार. शालेय शिक्षणात दहावीत त्यानं 90 टक्के गुण मिळवले. पुढील शिक्षण वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून पुर्ण केले. मेकॅनिकल डिप्लोमाची पदविका घेतली अन् हुशारीने त्याने कराड येथून याच विषयात अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. गल्लेलठ्ठ पगाराच्या नोकरी झिटकारून स्पर्धा परीक्षेचे करिअर करायचे ठरवले आणि ते साध्य ही करून दाखविले.

फळ विक्रीचा व्यवसाय करीत अशिक्षित आई-वडिलांनी त्याला पाठबळ दिले. मित्रांबरोबर गणेश अभ्यास करू लागला. बजरंग संकपाळ राजू पाटील यांनी दिलेल्या पाठबळमुळे गणेशला प्रोत्साहन मिळाले. आणि मोटार वाहतुक निरीक्षक पदाची परीक्षा त्याने दिली. दोन वर्षे त्याने कसुन अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात तो परीक्षा उत्तीर्ण झाला. आणि केळी विक्रीत्या जगदेवींचा मुलगा आज वाहतुक निरीक्षक म्हणून कोल्हापूर येथे रुजू झाला.

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT