पश्चिम महाराष्ट्र

बापरे ! विद्यार्थ्यांचा रोजच जीव धोक्‍यात; उपाययोजनांची गरज

सकाळ वृत्तसेवा

शिरवडे (जि. सातारा)  ः रेल्वे स्टेशन परिसरात लोहमार्ग रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. नडशी, उत्तर कोपर्डे व शिरवडे रेल्वे स्टेशन परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तर बॅंक, पोस्ट ऑफिस व सह्याद्री साखर कारखाना येथील दैनंदिन व्यवहारासाठी स्थानिकांनाही रोजच लोहमार्ग ओलांडताना जीवघेणी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. यंत्रांच्या आवाजाची खटखट, धुळीचे साम्राज्य यामुळे स्थानिक आबालवृध्द हतबल झाले आहेत. 

यशवंतनगर येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत तसेच कऱ्हाड येथे महाविद्यालयात शिक्षणासाठी नडशी, शिरवडे, उत्तर कोपर्डे परिसरातून विद्यार्थी जातात. त्याठिकाणी शाळेत जाण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत. रेल्वे स्टेशनमधून किंवा नडशी कॉलनी येथील रस्ता ओलांडून जावे लागते. यापैकी रेल्वे स्टेशनमधून जाणारा मार्ग सुरक्षित आहे. परंतु, या रस्त्यावर एक ते दीड किलोमीटर अंतर वाढत असल्यामुळे विद्यार्थी नडशी कॉलनी येथील कच्या रस्त्याचा वापर करतात. याठिकाणी रेल्वे रुळांना वळण असल्यामुळे समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वे गाड्यांचा अंदाज वृद्ध, गरोदर स्त्रिया आणि लहान मुलांना येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. त्याठिकाणी अनेकदा रेल्वेखाली जनावरे व माणसे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.

सध्या पुणे-लोंढा लोहमार्ग दुहेरीकरण व रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. सद्य:स्थितीत या ठिकाणी दोन लोहमार्ग आहेत. दुहेरीकरणाचे काम पूर्ण होताच येथे दोन मुख्य, क्रॉसिंग व धक्का असे पाच रेल्वे रूळ होणार आहेत. भविष्यात या मार्गावर रेल्वे प्रवासी व माल वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळेही धोकाही वाढणार आहे. रेल्वे दुहेरीकरणासाठी या परिसरात खोदकाम करण्यात आले आहे. या कामामुळे दहा ते बारा फुटांची दगडी भिंतच जणू तयार झालेली आहे. शाळेत जाण्यासाठी लहान मुलांना ही दगडी भिंत पार करावी लागते. सुमारे तीन वर्षांपूर्वी नडशीतील रेल्वे फाटक बंद करण्यात आले. उत्तर कोपर्डे येथील विद्यार्थ्यांना हेच फाटक ओलांडून जावे लागते. लहान मुलांना रेल्वे गाड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. लोहमार्ग ओलांडून जाणे बेकायदेशीर असल्याचे रेल्वे प्रशासन सांगते. परंतु, पर्यायी मार्ग देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची खंत स्थानिकांतून व्यक्त होत आहे. 

हेही वाचा :  कोरोना संशयितांना निगराणीखाली येथे ठेवणार

रेल्वे रुळांच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर ओव्हरब्रीज करण्यात येईल. ग्रामस्थांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केल्यास ग्रामस्थांसाठी सोयीस्कर ठिकाणी ओव्हरब्रीज तयार करता येईल. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करावा. 

लक्ष्मण तोडासे, प्रकल्प अधिकारी, पुणे-लोंढा लोहमार्ग 
 

नडशी ग्रामस्थांच्या सोयीसाठी रेल्वेने आवश्‍यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. नडशीजवळ दुसरा पायपूल मंजूर व्हावा, यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पत्रव्यवहार करून हा प्रश्न मार्गी लावला जाईल. 

गोविंदराव थोरात, सरपंच, ग्रामपंचायत नडशी

We Care नक्की पहा Video : हात स्वच्छ धुण्याचे सात प्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab Sanjeev Arora ED Action: पंजाबचे कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांना अटक, ईडीचे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात छापे

SSC Result: जिद्द, मेहनत आणि चिकाटी... वय फक्त आकडा ठरलं; ६३ वर्षीय महिलेनं ४१ वर्षांनंतर दहावीचं स्वप्न पूर्ण केलं

अवधूत गुप्तेंच्या आवाजातील 'तुंबाडची मंजुळा'मधील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला! सोशल मीडियावर होतेय चर्चा

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये वडकीत 58 जनावरांची सुटका, तिघांना अटक

Shaktipeeth Highway Land Acquisition : शक्तिपीठ महामार्गासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया; राज्य सरकारकडून अंतर्गत हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT