The student's abduction attempt was foiled 
पश्चिम महाराष्ट्र

विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला 

सुनील नवले

श्रीरामपूर : खासगी शिकवणीसाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न आज त्याच्या सतर्कतेमुळे फसला. वरुण विशाल फोपळे (वय 17), असे या विद्यार्थ्याचे नाव असून, शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार करण्यात आली आहे. 

विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या कनिष्ठ महाविद्यालयात वरुण शास्त्र शाखेत शिकत आहे. त्याने खासगी शिकवणी लावली आहे. आज सायंकाळी पाचच्या सुमारास तो शिकवणीसाठी अखंडानंद आश्रमाजवळ गेला होता. त्या वेळी एका मोटारीतून तिघे जण तेथे आले. त्यांतील एकाने वरुणला, "मी तुझा मामा आहे. तुझ्या आईने तुला घरी बोलाविले आहे,' असे सांगितले. त्याने आपले नाव नीलेश फिरोदिया असे सांगितले. वरुणने त्याच्याशी मारवाडी भाषेत संवाद केला; मात्र फिरोदिया आडनावाचे आपले कोणी मामा नाही, असे वरुणला माहीत असल्याने, त्याने व्यापारी संघटनेचे अध्यक्ष असलेले वडील विशाल फोपळे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला. हे लक्षात येताच मोटारीतील तिघांनी पळ काढला. मात्र, जाताना त्यांनी वरुणला हात धरून ओढण्याचा प्रयत्न केला. गर्दीचे ठिकाण असल्याने अपहरणकर्त्यांनी मोटार जोरात पळवून धूम ठोकली. 

विशाल फोपळे यांनी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट तपास करीत आहेत. अपहरणकर्त्यांची मोटार जिजामाता चौकातून गेली. त्या भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT