summer crop of onion in nipani increased the rate of seeds in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

उन्हाळी कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ; बियाणांचे दरही कडाडले

सकाळ वृत्तसेवा

निपाणी (बेळगाव) : तालुक्यातील कांदा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही कामे संपणार आहेत. मात्र लागवडीचा खर्च वाढल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. त्यामध्ये बियाणे आणि तरू दरही गगनाला भिडले आहेत. त्यात आता कांद्याला किती भाव मिळणार, याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे.

तालुक्यात सौंदलगा, आडी, बेनाडी, आप्पाचीवाडी, कुर्ली, भाट नांगनूर, भिवशी, जत्राट भागात सर्वाधिक कांदा लागवड होते. शेती नसलेल्या काही शेतकऱयांनीही त्यासाठी फाळा पद्धतीने शेती घेतली आहे. शेतकरी दरवर्षी कांदा लागवडीसाठी 1800 ते 2000 रुपये किलोने कांद्याचे बियाणे खरेदी करतात. मात्र यंदा 3 ते 4 हजार रुपये द्यावे लागले आहेत. परिणामी लागवड खर्चात मोठी वाढ झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांनी यंदा कांद्याला किमान 3000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

देशातून कांद्यायाची निर्यात सुरू राहिल्यास अपेक्षित भाव निश्चित मिळू शकतो, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. कांद्याला यंदाचा लागवडीचा आलेला खर्च एकरी 50 हजारांच्या घरात आहे. मजूर मिळत नसल्याने मोठा प्रश्न उभा राहिला आहे. खते, फवारणी, रासायनिक औषधांच्या वाढलेल्या दरामुळे देखील शेतकरी हैराण आहेत.

निर्यात धोरण आडमुठे 

शेतकऱ्यांच्या घरात कांदा होता, तेंव्हा शासनाने निर्यात बंद केली. कांदा संपल्यावर निर्यात सुरू करण्यात आली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकयांचा रोष वाढला आहे. शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱयांना लागवड खर्च निघणेही कठीण झाले आहे.

"दरवर्षी 1800 ते 2000 रुपये किलोने कांद्याचे बियाणे आणून तरूची निर्मिती केली जात. पण यंदा 3 ते 4 हजाराने बियाण्यांची खरेदी केली. शिवाय तरुच्या निर्मितीसाठीही जादा खर्च आला आहे. त्यासाठी खर्चाच्या तुलनेत कांद्याला दर मिळणे आवश्यक आहे."
 

- सिद्धाप्पा जोडट्टी, कांदा उत्पादक शेतकरी, नवलिहाळ

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT