Suspension of Anganwadi Servant for stolan the poshan aahar 
पश्चिम महाराष्ट्र

अंगणवाडी सेविकेचाच पोषण आहारावर डल्ला

आनंद गायकवाड

संगमनेर : तालुक्‍याच्या पठार भागातील मोधळवाडी येथील अंगणवाडीतील मुलांसाठी आलेल्या शालेय पोषण आहार हंड्यातून घरी नेताना अंगणवाडी सेविका व मदतनीस आढळून आली. हा प्रकार समोर आल्यावर संतप्त ग्रामस्थांनी अंगणवाडीलाच कुलूप ठोकले. घारगावच्या बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली कुकडे यांनी मोधळवाडी येथे भेट देऊन दोन्ही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. अंगणवाडी सेविका ताराबाई कुडेकर व मदतनीस पुष्पा थोरात अशी त्यांची नावे आहेत. 

तालुक्‍यातील मोधळवाडी येथील अंगणवाडीतील शालेय पोषण आहारातील मसूर व हरभरा डाळ स्टीलच्या हंड्यात घालून घरी नेताना, मंगळवारी (ता.21) अंगणवाडी सेविका व मदतनिस महिलेला काही ग्रामस्थांनी पाहिले. ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारत चोरलेला मुद्देमालाचा पंचनामा करून तो जप्त केला. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी अंगणवाडीला कुलूप लावले. दोन्ही महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत कुलूप न उघडण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला होता. 

दुसऱ्या सेविकेची नेमणूक

घारगावच्या बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली कुकडे यांनी बुधवारी (ता.22) मोधळवाडीला भेट दिली. या प्रकरणाची माहिती घेतली. अंगणवाडी केंद्रातील शिल्लक पोषण आहाराची रजिस्टरप्रमाणे मोजदाद केली असता, त्यात 2 किलो मसूर डाळ व अर्धा किलो हरभरा डाळ कमी असल्याचे आढळून आले. याप्रकरणी अंगणवाडी सेविका ताराबाई कुडेकर व मदतनिस पुष्पा थोरात यांचे लगेच निलंबन केले. त्यांच्या जागी तातडीने दुसऱ्या सेविकेची नेमणूक केल्याचे सांगितले. त्यानंतर अंगणवाडीचे कुलूप उघडण्यात आले. 

अंगणवाडीत पिशवी नेता येत नाही

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना अंगणवाडीत पिशवी अथवा पर्स नेता येत नाही. घारगाव प्रकल्प कार्यालयांतर्गत असणाऱ्या अंगणवाडीत जाताना पर्स किंवा पिशवी घेऊन जाणाऱ्या अशा सेविका आणि मदतनीस यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 
- वैशाली कुकडे, बालविकास प्रकल्प अधिकारी, घारगाव 

सुधारण्याची संधी मिळावी

अंगणवाडी सेविकांनी समर्पणवृत्ती व प्रामाणिकपणे सेवा करणे, अंगणवाडी संघटनेला अपेक्षित आहे. अशा प्रकारची चूक गंभीर आहे. मात्र, त्यांच्या सेवेचा कालावधी लक्षात घेता, योग्य ती कारवाई करून त्यांना सुधारण्याची संधी मिळावी. त्यांच्या रोजीरोटीवर गदा आणू नये. 
- ऍड. नीशा शिवूरकर, राज्य अध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी सभा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस तर 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट

Pune News: थरारक जलक्रीडांनी रंगला ‘रिगाटा महोत्सव’; पुण्यात ९८ वर्षांच्या परंपरेचा जलतिमाही उत्सव, नौकांची धमाल!

Beed News: मस्साजोग ग्रामपंचायत निवडणूक जाहीर; २८ एप्रिलला मतदान, गावात राजकीय वातावरण तापले

Chhatrapati Sambhajinagar: सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी अलॉटमेंट जाहीर; नीट एसएस काउन्सिलिंग ; घाटीत सात विषयांत २६ जागांसाठी प्रवेश निश्‍चिती सुरू

Pune Railway Workshop: ‘वंदे भारत’च्या चाकांना पुण्यात मिळणार आकार; लवकरच २१ कोटींची लेथ मशिन दाखल, रेल्वेची चाके सुस्थितीत राहणार!

SCROLL FOR NEXT