Swine-Flu
Swine-Flu 
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाडातही स्वाइन फ्लूचा फिव्हर

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड - शहरासह कऱ्हाड तालुक्‍यातही स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. अनेकांना सध्या ताप, सर्दी, अंगदुखी, खोकला, डोकेदुखी सुरू आहे. त्यामुळे आपल्याला स्वाइन फ्लू तर झाला नाही ना, या धास्तीने अनेक जण तपासणीसाठी शासकीय व खासगी दवाखाना गाठत आहेत. तपासणीसाठी रांगा लागल्याचे दिसते. स्वाइन फ्लूने आतापर्यंत तालुक्‍यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

स्वाइन फ्लूचा सध्या फैलाव होण्याचे प्रमाण वाढले आहे. या आजाराबाबत रुग्णांत मोठी धास्ती आहे. परिणामी अनेकांनी खासगी रुग्णालयांत उपचार घेऊन शासकीय रुग्णालयातही तपासणी करून घेत आहेत. दोन आठवड्यापासून वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्‍शन वाढले आहे. त्यामुळेही खासगी दवाखाने आणि शासकीय रुग्णालये फुल्ल आहेत.

आठवड्यापासून त्यात मोठी वाढ झाली आहे. स्वाइन फ्लूच्या प्रादुर्भावाने आतापर्यंत तालुक्‍यातील पाच रुग्ण दगावलेत. त्यामुळे संबंधित गावांत स्वाइन फ्लूसंदर्भात चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. 

उपजिल्हा रुग्णालयात वॉर्ड 
उपजिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आला असून तेथे डॉ. दीपक कुऱ्हाडे यांची स्वतंत्ररीत्या नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे यांनी दिली. उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. त्यामुळे रुग्णांनी न घाबरता उपचारासाठी यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

वातावरणातील बदलामुळे सध्या व्हायरल इन्फेक्‍शनच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच स्वाइन फ्लूच्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. रुग्णांनी कोणताही आजार अंगावर काढू नये. तातडीने रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. 
- डॉ. सुनील कोरबू, तालुका आरोग्य अधिकारी, कऱ्हाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT